कोपरगांव तालुक्यातील जनतेला विवेक भैय्या कोल्हे रूपाने सोन्याचा परिस लाभला – जेष्ठ व्यापारी नारायण अग्रवाल.
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
(अरुण आहेर)
कोपरगांव तालुक्यातील जनतेला विवेक भैय्या कोल्हे रूपाने सोन्याचा परिस लाभला – जेष्ठ व्यापारी नारायण अग्रवाल.
कोपरगाव; तरुण,तडफदार उच्च विभूषित,विचार व आचार संपन्न सहृदयी नेतृत्व असलेल्या श्री.विवेकभैया कोल्हे यांनी गेल्या पाच सहा वर्षाच्या काळात विवेक भैया यांनी आपल्या कार्यातून जनतेच्या मनावर खोलवर ठसा उमटवलेला आहे हे विरोधकही मान्य करतील.जनतेची व कार्यकर्त्यांची नड व नाडी ओळखली म्हणजे सार्वजनिक जीवनात “नेता” नक्कीच यशस्वी होतो.यात विवेक भैया नेहमीच अग्रेसर राहिले संजीवनी युवा प्रतिष्ठान द्वारे त्यांनी केलेले सामाजिक काम त्यांना सार्वजनिक जीवनात व राजकीय जीवनात दीपस्तंभ सारखे राहील.
संजीवनी कारखान्याचे चेअरमन जिल्हा बँकेचे संचालक म्हणून त्यांनी केलेला कारभार पारदर्शक व मार्गदर्शक आहे.
उभ्या महाराष्ट्रात तरुण नेतृत्वाची फळी तयार होत आहे त्यात विवेक भैया यांचे नाव अग्रेसर राहील यात शंका नाही.
विवेकभैया केवळ वारसा नाही !जनसेवेचा “वसा” असलेल्या नेत्याला जनता डोक्यावर घेतल्या
शिवाय रहाणार नाही अशी ठाम ग्वाही नारायण अग्रवाल यांनी दिली.