कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फुुलंब्री:- 2 लाख रूपये पंचायत समिती समोर उधळणाऱ्या गवराई पायगावचे तरुण व तडफदार लोकप्रतिनिधी(सरपंच) मंगेश साबळे यांची RPS STAR NEWS कडून मुलाखत.

प्रतिनिधी शिवनाथ चिकणे छत्रपती संभाजीनगर:9890949872

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

प्रतिनिधी शिवनाथ चिकणे छत्रपती संभाजीनगर

दिनांक:- 1 एप्रिल- फुलंब्री:गेवराई पायगा येथील तरुण व तडफदार सरपंच मंगेश साबळे यांनी शुक्रवारी दिनांक 31 3 2023 रोजी पंचायत समिती फुलंब्री समोर अनोख्या पद्धतीने तेथील BDO तसेच त्यांचे सहकारी यांनी चालवलेल्या शेतकऱ्यांची लूट हे जगासमोर आणण्यासाठी अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला फुलंब्री पंचायत समिती येथील बीडीओ ज्योती आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गेवराई पायगा येथील शेतकऱ्यांच्या विहिरी मंजूर करण्यासाठी सरपंच मंगेश साबळे यांच्याकडे लाचेची मागणी केली होती तरीही त्यांनी काही शेतकऱ्यांकडून पाच पाच हजार रुपये जमा करून BDO ना देण्यासाठी नेले होते तरीही BDO व त्यांचे कर्मचारी विहीर मंजूर करण्यास नकार देत होते शेवटी सरपंच मंगेश साबळे यांनी तेच जमा केलेले शेतकऱ्यांचे पैसे तेथे उधळून तेथील कर्मचाऱ्यांचा निषेध केला याचा व्हिडिओ व्हायरल होताच संपूर्ण महाराष्ट्रभर पसरला याची दखलखेत मंत्री गिरीश महाजन यांनी पंचायत समिती फुलंब्री येथील BDO यांना बडतर्फ करण्याच्या सूचना दिल्या व घडलेल्या प्रकाराची संपूर्ण तपासणी करण्याच्या आदेश दिले ह्या प्रकरणाहून असे दिसून येते की लाच प्रतिबंधक कायद्याची सर्वत्र पालन होत नाही आम्ही मंगेश साबळे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आम्हाला संपूर्ण घटनेची माहिती दिली व आमच्या चैनल द्वारे दोषी अधिकाऱ्यांवर लवकरात लवकर कायदेशीर कार्यवाही करण्याची विनंती केली.प्रतिनिधी शिवनाथ चिकणे,अमोल चव्हाण.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button