आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माण:-अभियंता सुनील पोरे यांचे हस्ते म्हसवड येथे बक्षीस वितरण.

प्रतिनिधी अजित जगताप सातारा:-9922241299

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

अभियंता सुनील पोरे यांचे हस्ते म्हसवड येथे बक्षीस वितरण
(अजित जगताप)
म्हसवड दि:
एकात्मिक बालविकास सेवा योजना नागरी प्रकल्प सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने माण तालुक्यातील अंगणवाडी क्रमांक १०२ कोष्ट गल्ली म्हसवड येथे आंतरराष्ट्रीय तृणधान्य व भरड धान्य वर्ष 2023 च्या अनुषंगाने पोषण पंधरवडा साजरा करण्यात आला. त्यामध्ये घेतलेल्या स्पर्धांचे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम व गायत्री फुटाणे यांनी घेतलेल्या मेहंदी कोर्स चे प्रमापत्र वितरण अभियंता सुनील पोरे व सौ. सुवर्ण पोरे व तरंग रेडिओ वॄतनिवेदिका कांचन ढवण यांच्या हस्ते प्रमाण पत्र प्रदान करण्यात आले.
प्रस्ताविक अश्विनी फुटाणे केले. यावेळी तॄण व कडधान्ये शरीरास किती गरजेच्या आहेत. याची माहिती दिली. याप्रसंगी सौ प्रियांका नामदास,कांचन ढवण यांनी मनोगत व्यक्त केले. श्री. पोरे यांनी आपले मनोगतात सामान्य माणूस केंद्र बिंदू मानून केलेले व करावयाचे योजना बाबत माहिती दिली. अंगणवाडीसाठी लागेल ती मदत करु असे ही म्हटले. स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. बक्षीस मिळाले ते बक्षीसारथी पुढीलप्रमाणे “२०२२-२३ तृणधान्य विशेष बक्षीस पात्र नावे”

१. स्वस्त बालक स्पर्धा

मोठा गट – ज्ञानदा महेश कवडे

लहान गट – अद्विक सचिन कलढोणे

२. रांगोळी सीनियर स्पर्धा

प्रथम क्रमांक – पूजा खटावकर

द्वितीय क्रमांक – रोहिणी खटावकर

३. रांगोळी ज्युनियर स्पर्धा

प्रथम क्रमांक – विशाखा कवडे

द्वितीय क्रमांक – अनुष्का कलढोणे

४. तृणधान्य घोषवाक्य स्पर्धा

प्रथम क्रमांक – मनीषा भंडारे

द्वितीय क्रमांक – वेदांती भागवत

५. तृणधान्य निबंध स्पर्धा

प्रथम क्रमांक – पोर्णिमा पोरे

द्वितीय क्रमांक – प्रियांका नामदास
यावेळी अतुल फुटाणे, शार्दुल फुटाणे,श्रीमती माने,सौ रोकडे,सौ नामदास,सौ भागवत,सौ कवडे,सौ खटावकर,सौ गोंजारी आदी महिला पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते . उपस्थितांचे स्वागत व आभार मैथिली फुटाणे हिने मानले.
—————————————
छाया – म्हसवड येथे अंगणवाडी बाबत प्रमाण पत्र वितरीत करताना श्री सुनिल पोरे व सौ पोरे (छाया – अजित जगताप)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button