ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राहता:-बाबळेश्वरच्या दूध कामगार पतसंस्थेच्या चेअरमन पदी मनोज भोंगळे तर व्हा.चेअरमन पदी रशीद शेख यांची निवड.

प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

लोहगाव (वार्ताहर)
राहाता तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या दूध कर्मचारी विकास सहकारी सेवक पतसंस्थेच्या निवडणुकीत सत्ताधारी श्रीराम दूध कर्मचारी विकास मंडळ व जागृती दूध कर्मचारी विकास मंडळ यामध्ये लढत झाली होती यात जागृती दूध कर्मचारी विकास मंडळाचा संपूर्ण ९ जागेवर विजय झाला होता. सोमवार दि.२७ रोजी सकाळी ११ व.निवडणूक निर्णय अधिकारी राजेश सदाफळ यांच्या अध्यक्षतेखाली चेअरमन व व्हा .चेअरमन निवडीचा कार्यक्रम झाला. यात पतसंस्थेच्या चेअरमन पदी मनोज रघुनाथ भोंगळे तर व्हा.चेअरमन पदी रशीद कंकर शेख यांची निवड करण्यात आली.चेअरमन पदाच्या निवडीत सूचक म्हणून भारत शेळके तर अनुमोदक म्हणून बाळासाहेब दरंदले यांनी स्वाक्षरी केली तर व्हा. चेअरमन निवडीत सूचक म्हणून राजेंद्र मिसाळ तर अनुमोदक म्हणून म्हसु गुंजाळ यांनी स्वाक्षरी केली. या प्रसंगी पतसंस्थेचे मा.संचालक श्री.संजय इनामके यांच्या हस्ते नवनिर्वाचित चेअरमन. मनोज भोंगळे व व्हा.चेरमन रशिद शेख व संचालक मंडळ आणि निवडणूक निर्णय अधिकारी श्री राजेश सदाफळ. व पतसंस्थेचे सचिव अण्णा साहेब बेंद्रे यांचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी बाळासाहेब दरंदले ,पोपट पवार ,सुरेश लुटे ,विठ्ठल शिंदे ,भारत शेळके ,राजेंद्र मिसाळ,म्हसु गुंजाळ ,अण्णासाहेब पुलाटे ,सुभाष गोरे ,अरुण खर्डे ,मधुकर शिंदे ,दिनकर शिंदे ,सोपान आरंगळे ,जयराम दाणेकर, आदी सभासद कर्मचारी उपस्थित होते. या वेळी श्री संजय इनामके यांनी सर्वांचे आभार मानले.
शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button