सातारा:-खटाव तालुक्यातील महत्त्वाच्या तीन गावांचा 24 बाय सात पाणीपुरवठा योजनेत समावेश.
प्रतिनिधी प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
खटाव तालुक्यातील महत्त्वाच्या तीन गावांचा 24 बाय सात पाणीपुरवठा योजनेत समावेश.
__मायणी प्रतिनिधी__कायम दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या खटाव तालुक्यातील कलेढोण अनफळे व गोरेगाव निमसोड या तीन गावांचा 24 बाय सात या पाणीपुरवठा योजनेत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी समावेश केला असल्याची माहिती खटाव तालुक्याचे माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांनी दिली अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की अनफळे व. कलेढोण या गावांचा पाण्याचा उद्भव हा मायणी तलाव असून गोरेगाव निमसोड या गावाचा पाण्याचा उद्भव हा येरळा तलाव आहे लवकरच टेंडर निघाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल यानंतर आपण गारुडी गारळेवाडी तरसवाडी मुळीकवाडी विखळे ढोकळवाडी पाचवड कान्हेरवाडी हिवरवाडी पडळ मोराळे गुंडेवाडी या गावांचा समावेश केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही विधानसभेच्या अधिवेशनापूर्वी व अधिवेशनानंतर खटाव तालुक्यातील अनेक रस्त्याची व अनेक पाणीपुरवठा योजनेची कामे मंजूर केल्याने मायणी गटातील येळगावकरांचे कार्यकर्ते चार्ज झाले आहेत.