पुणे पिंपरी:-पाणीपुरवठा विभागातील लाचखोरीतील मोठया माशांना लाचलुचपत विभागाने धडा शिकवावा – अजित गव्हाणे
प्रतिनिधी शफीक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
पाणीपुरवठा विभागातील लाचखोरीतील मोठया माशांना लाचलुचपत विभागाने धडा शिकवावा – अजित गव्हाणे
पिंपरी, दि. 21 (शफिक शेख) :- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील लिपिकाला एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. हे महापालिकेतील भ्रष्टाचाराचे केवळ हिमनगाचे टोक असून हा भ्रष्टाचार करण्यास पाडणा-या बड्या अधिका-यासह त्यांना राजकीय पाठबळ देणा-या बड्या माशांना पकडावे. महापालिकेत निर्माण झालेल्या भ्रष्ट्र कारभाराला केवळ भाजपची सत्ता आणि त्यांचे नेतृत्त्व जबाबदार असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाणीपुरवठा विभागातील कारवाईत सापडलेल्या लिपिकांसह अधिका-यांची कसून चौकशी केल्यास मोठे मासे गळाला लागतील. केवळ कारवाईचा फार्स न करता दोषी वरिष्ठ अधिकारी आणि त्यांना राजकीय पाठबळ देणाऱ्या लोकांपर्यंतचे धागेदोरे शोधल्यास सत्य बाहेर येईल. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठ्या मास्यांपर्यंत आपल्या तपासाची सूत्रे नेल्यास महापालिकेतील भ्रष्टाचाराला अंकुश मिळेल, तसेच सत्यही बाहेर येईल, असेही या पत्रात गव्हाणे यांनी म्हटले आहे.
पाणीपुरवठा विभागात आज जी कारवाई झाली ती केवळ हिमनगाचे टोक आहे. प्रत्येक निविदा ही रिंग करून भरण्यात येत आहे. शेकडो कोटींच्या निविदा फुगविण्यात आल्या असून निश्चित दरापेक्षा अधिक रक्कमेने काम दिले जात आहे. जे ठेकेदार प्रामाणिकपणे काम करू पाहतात त्यांना दमबाजी करून बाजूला केले जात आहे. त्यासाठी महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचा-यांच्या माध्यमातून सर्रास निविदा ही आपल्या हस्तकांना देण्याचा प्रकार भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून सुरू आहे.‘जॅकवेल’ निविदेत करोडोंचा भ्रष्टाचार भामा आसखेड धरणातून पाणी उपसा करण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जॅकवेलच्या निविदेमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला आहे. पाणीपुरवठा विभागाने अशाच पद्धतीने अनेक निविदांमध्ये भ्रष्टाचार, लाचखोरी केली असून जॅकवेल निविदेचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही गव्हाणे यांनी केली आहे.