ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

खटाव:-मोराळे येथील सिमेंट बंधाऱ्याच्या कामाचा शुभारंभ.

प्रतिनिधी प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

मोराळे येथील सिमेंट बंधाऱ्याच्या कामाचा शुभारंभ__

मायणी प्रतिनिधी मोराळे तालुका खटाव येथील शिंदे ओढ्यावर सिमेंट बंधाऱ्याच्या कामाचा शुभारंभ येथील सरपंच संदीप जयसिंग शिंदे यांच्या हस्ते व खटावचे माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी एडवोकेट सुरज पाटील राजू झगडे राजाराम कचरे मधुकर कचरे डॉक्टर सुशांत देशमुख जयसिंगराव शिंदे एम एन जाधव यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना डॉक्टर येळगावकर म्हणाले की मायनी परिसरात अकरा सिमेंट बंधाऱ्याचे प्रस्ताव मी दिले होते परंतु जिल्हा नियोजन मंडळाकडे निधी नसल्याने बंधाऱ्याचे काम रेंगाळले होते परंतु मंत्रालय पातळीवर हे बंधारे आपण मंजूर केले आहेत खटाव तालुक्याचा पाणी प्रश्न हा माझा श्वास आहे माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी खटावच्या पाण्यासाठी संघर्ष करतच राहणार आहे विरोधकांनी कितीही अडथळे आणले तरी मी माझे काम करीत करीतच राहणार आहे यावेळी बोलताना सरपंच संदीप शिंदे म्हणाले की मोराळे हे गाव सदन गावांपैकी एक गाव असून या गावाचा समावेश पाणी फाउंडेशन मध्ये झाल्याने संपूर्ण गाव ओलीताखाली येणार आहे सदरच्या कामामुळे अधिकच त्यात भर पडली आहे या हे काम 15 लाखाचे असून परिसरातील विहिरींना फायदा होणार आहे सुमारे पाच हेक्टर जमीन ओलिताखाली येईल असे हे काम आहे गावाचा विकास हाच आमचा ध्यास आहे आणि हेच आमचे ध्येय आहे या
कार्यक्रमाच्या वेळी डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास दशरथ शिंदे बाळासो शिंदे तुकाराम शिंदे सोमनाथ शिंदे संदीप शिंदे गिरीश घोलप अरुण शिंदे ज्योतीराम शिंदे पंढरीनाथ शिंदे चंद्रकांत शिंदे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते शेवटी दशरथ शिंदे यांनी आभार मानले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button