कोरेगाव:-श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे शिक्षण सप्ताह निमित्त कौशल्य विकास अंतर्गत कागदकाम कार्यशाळा.
पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष
RPS STAR NEWS
श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे शिक्षण सप्ताह निमित्त कौशल्य विकास अंतर्गत कागदकाम कार्यशाळा.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांच्या अंगभूत कौशल्यांचा विकास व्हावा या उद्देशाने कागदकाम कार्यशाळेअंतर्गत श्री मनोहर शिर्के सर व श्री. सूर्यकांत गेजगे सर यांनी कागदापासून विविध वस्तू बनवण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.
उपशिक्षक श्री सूर्यकांत गेजगे सर यांनी टाकाऊ कागदापासून पंखा तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
कलाशिक्षक श्री मनोहर शिर्के सर यांनी कागदापासून सहज व सोप्या पद्धतीने विविध मुखवटे बनवण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. त्यांनी तयार केलेला वाघ व पांडा यांचे मुखवटा सर्व विद्यार्थांना आवडला. तयार केलेल्या विविध मुखवट्यांचा वापर करून इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी एक इंग्रजी नाटिका सादर करून त्यामाध्यमातून एक नाविन्यपूर्ण उपक्रम सादर झाला.
माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापक सौ.भारती मोहिते मॅडम यांनी या कार्यशाळेदरम्यान शिक्षणामध्ये कला व कार्यानुभव अंतर्गत कौशल्य विकासाचे महत्व समजावून सांगितले. टाकाऊ वस्तूंपासून बनवलेल्या विविध टिकाऊ व शोभेच्या वस्तू दाखवल्या.
यावेळी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री.दीपक माने सर, श्री.रवींद्रनाथ मोहिते सर ,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.