नगर:-नगरला 61% शिर्डीला 62% मतदान . कोल्हारला अवैधरित्या शाई लावराणारा तर शेवगावला व्हिहिओ काढणाऱ्यावर गुन्हा दाखल …
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
RPS STAR NEWS
नगरला 61% शिर्डीला 62% मतदान . कोल्हारला अवैधरित्या शाई लावराणारा तर शेवगावला व्हिहिओ काढणाऱ्यावर गुन्हा दाखल …
नगर दि 13 ( जिमाका ) लोकसभा सार्वात्रिक निवडणूकीसाठीच्या चौध्या टप्णात 37 – नगर व 38 – शिर्डी लोकसभा मतदान संघासाठी सोमवार . दि 13 मे रोजी मतदान सुरळीतपणे पार पडले . 37 – नगर लोकसभा मतदान संघात अंदाजे सरासरी 62 टक्के मतदान झाल्यची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत दरम्यान नगर येथे किरकोळ वादातून राजकीय पक्षांच्या कार्यकत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथे मतदाराने ईव्हीएमवरील मतदादानाचे चि श्रीकरण केल्याने संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला तर राहाता तालुक्यातील कोल्हार येथे निळ्या रंगाच्या शाईची बाटली घेऊन अवैधरित्या शाई लावणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निवडणूकी दरम्यान अशा किरकोळ घटना वगळता नगर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकी साठीचे मतदान शांततेत पार पडले असल्याची माहितीही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री सालीमठ यांनी यावेळी दिली.