पाटण:-घोटचे रविराज सोनावले यांचा पालक मंत्री शुंभराज देसाई यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांच्या शिव सेनेत प्रवेश.
प्रतिनिधी महेश मोहिते सातारा:-9167564361

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
घोटचे रविराज सोनावले यांचा पालक मंत्री शुंभराज देसाई यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांच्या शिव सेनेत प्रवेश.
घोट तालुका पाटण या गावचे रविराज नंदकुमार सोनावले (मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य,जिल्हाध्यक्ष सातारा) उद्धव ठाकरे सेनेचे ग्रामपंचायतचे उमेदवार होते, ज्यांनी हनुमान वार्ड मधून 94 मते घेतली, त्यांनी आज त्यांच्या कार्यकर्त्यांसह नामदार शंभूराज देसाई साहेब राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री सातारा आणि ठाणे जिल्हा यांच्या उपस्थिती मधे बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांच्याबरोबर विलास सोनावले गणेश सयाजी सोनावले, राजेंद्र सुरेश भिसे हे ठाकरे गटाचे कट्टर असणारे कार्यकर्ते यांनीही प्रवेश केला, घोट गावचे शिवसेना शाखाप्रमुख दीपक सोनावले यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रवेश झाला त्याबद्द्ल साहेबांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.
साहेबांच्या वतीने सर्वांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिवदौलत बँकेचे संचालक अभिजीत पाटील घोटच्या उपसरपंच सौ सुरेखा संजय कुमार सोनावले, युवा सेनेचे शाखाप्रमुख गणेश राज सोनावले व संजय सोनावले इत्यादी उपस्थित होते.