ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुंबई:-अल्प कागदपत्रांत राज्यातील तृतियपंथीयांना शिधापत्रिका देणार.

प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-८२०८७१७४८३.

अल्प कागदपत्रांत राज्यातील तृतियपंथीयांना शिधापत्रिका देणार.
मुंबई, दि. 1 (शफिक शेख):- तृतीयपंथीय नागरिकांना सर्वसामान्य नागरिकांमप्रमाणे शिधापत्रिका वितरीत करताना कागदोपत्री अडचणींचा सामना करावा लागतो. या अडचणींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून महाराष्ट्र शासन, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्याकडून तृतीयपंथीय नागरिकांना नवीन शिधापत्रिकेसाठी अल्प कागदपत्रांत शिधापत्रिका देण्याचे आदेश महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यामार्फत देण्यात आले.
तृतीयपंथीय नागरिक हे ही या समाजाचे घटक असून त्यांनाही सन्मानाने जगण्याचा आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्याचा अधिकार आहे. ही बाब विचारात घेवून राज्यातील तृतीयपंथीय नागरिकांना नवीन शिधापत्रिका घेताना त्यंाना ओळखीचा पुरावा आणि वास्तव्याचा पुरावा सादर करण्याबाबत सूट देण्यात आली आहे. त्यांच्याकडून सदर कागदपत्रांची मागणी करण्यात येवू नयेत असे या आदेशात नमूद केले आहे. तृतीयपंथीय नागरिक म्हणून शिधापत्रिका घेताना खालीलपैकी कोणत्याही एका बाबीची पूर्तता करणे आवश्यक आहे. त्या एका कागदपत्रानेही त्यांना नवीन शिधापत्रिका देण्याचे आदेश देण्यात आले आहे.
1. मुंबई व राज्य एड्स नियंत्रण संस्था यांचेकडील यादीमध्ये नाव असावे किंवा
2. मतदार यादीमध्ये मतदार म्हणून प्राप्त झालेले मतदार ओळखपत्र. (यामध्ये तृतीयपंथीय असा उल्लेख असणे आवश्यक नाही).
3. तृतीयपंथीयांना जिल्हाधिकारी यांनी वितरीत केलेले प्रमाणपत्र किंवा
4. जिल्हा समाजकल्याण अधिकारी किंवा राजपत्रित अधिका-याचे तृतीयपंथीय असल्याचे प्रमाणपत्र किंवा
5. सार्वजनिक विश्वस्त अधिनियम/सहकारी संस्था अधिनियमांतर्गत नोंदणी असलेल्या संस्थेने दिलेले तृतीयपंथीय असल्याचे प्रमाणपत्र.
वरीलपैकी कोणतेही एक कागदपत्र किंवा आधार कार्ड उपलब्ध नसल्यास अर्जदाराने स्वयंघोषणापत्र भरून दिल्यासही त्यांना शिधापत्रिका देण्यात येईल. सदर स्वयंघोषणापत्राची लिंक खाली दिलेली आहे.
https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202209271217006006.pdf
त्यावरून डाउनलोड करावे अथवा 9767275783/7276585757 या क्रमांकावर संपर्क साधून सदर घोषणापत्र मोफत प्राप्त करावे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button