आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मायणी:-संत सरूताईंच्या पंढरपूर दिंडी सोहळ्याचे दि.१ डिसेंबर सोमवारी प्रस्थान.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

संत सरूताईंच्या पंढरपूर दिंडी सोहळ्याचे दि.१ डिसेंबर सोमवारी प्रस्थान.

मायणी प्रतिनिधी—-
मायणी तालुका खटाव येथील श्री संत सद्गुरु मातोश्री सरू ताई माऊली यांचा एक दिवशीय दिंडी सोहळा श्रीक्षेत्र मायणी ते श्रीक्षेत्र पंढरपूर सोमवार दिनांक १ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे.या दिवशी पहाटे सहा वाजता माऊलींचा अभिषेक सोहळा,सकाळी सात वाजता आरती,सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी माजी आमदार डॉ. दिलीपरावजी येळगावकर यांच्या हस्ते पालखी अभिषेक व पूजन होणार असून,नंतर सकाळी नऊ वाजता पालखी सोहळ्याचे श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.या दिंडी सोहळ्यामध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.असे आवाहन श्रीसंत सद्गुरु मातोश्री सरुताई माऊली देवस्थान ट्रस्ट मायणी यांच्या वतीने करण्यात आले आहे. -दिलीप पुस्तके




