ताज्या घडामोडी

सातारा:-कोंडवे हद्दीत गोळीबाराच्या घटनेने दोन युवक जखमी , सीसीटीव्हीत प्रकार कैद…

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

कोंडवे हद्दीत गोळीबाराच्या घटनेने दोन युवक जखमी , सीसीटीव्हीत प्रकार कैद…

कोंढवे दि:
सातारा- मेढा रस्त्यावरील कोंडवे समर्थ नगर
परिसरात काल सोमवारी दिनांक २७ जानेवारी रोजी दुपारी साडेतीनच्या दरम्यान येथील पेट्रोल पंप परिसरात विना नंबर प्लेट असलेल्या एक्टिवा गाडीवरून आलेल्या दोन युवकांनी साताऱ्याकडे जाणाऱ्या दुसऱ्या दोन युवकांवर गोळीबार
केला . सदरचा प्रकार सी.सी.टी.व्ही.मध्ये कैद झाल्या असून त्याची कसून तपासणी सुरू आहे.

या गोळीबारामध्ये अमर गणेश पवार वय २१ (तामजाईनगर ) व श्रेयस सुधीर भोसले वय २२ रा मोळाचा ओढा हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर क्रांतिसिंह नाना पाटील सातारा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सातारा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मध्ये सर्व शासकीय व पोलीस यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते . अशा वेळेला भर दुपारी कोंडवे येथील गोळीबार प्रकरणानंतर सातारा तालुका पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी पेट्रोल पंप परिसरामध्ये पाहणी केली . सदरचा प्रकार पूर्व वैमन्यासातून झाले असेल का? या दृष्टीने तपास केला जात आहे. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती.
साताऱ्याचे उपविभागीय अधिकारी राजीव नवले यांनी घटनास्थळाला भेट दिली. या ठिकाणी असलेल्या सी.सी.टी.व्ही. कॅमेरा ची बारकाईने पाहणी केली.विना नंबर प्लेटच्या एक्टिवा दुचाकी गाडीवरून आलेल्या दोन तरुणांनी जखमींवर गोळीबार केल्याचे दिसून येत आहे. हल्लेखोर दोन युवकांच्या शोधार्थ सातारा पोलिसांचे दोन पथके रवाना झाले आहेत.अवैध धंद्यातून मिळालेल्या संपत्तीचा वापर तरुण पिढीला बरबाद करण्यासाठी काहीजण जाणीवपूर्वक करत आहेत. त्यामुळे सातारा शहरातील पेन्शनर्स सारख्या गावात सध्या अवैध धंद्यातूनच कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणारे प्रकार घडत आहेत.सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तातडीच्या तपासाच्या सूचना दिली आहेत. याबाबत अधिक तपास सातारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे करत आहेत. दरम्यान, सातारा शहरांमधील अवैद्य धंद्याचा म्होरक्या व त्याच्या इशारामुळे झालेल्या सर्वच गुन्ह्याचे फेर तपासणी करून चांगल्या घराण्यातील व शिक्षण घेणाऱ्या तरुण पिढीला चांगल्या मार्गाला लावण्यासाठी समाजातील सर्व स्तराने प्रयत्न करावेत. असे आवाहन केले जात आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

_________________________________
कोंडवे हद्दीत झालेल्या गोळीबार प्रकरणी पाहणी करताना पोलीस दल

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button