पुणे:-(आंबेगाव)-बतावणी करून मंगळसुत्र घेवून जाणाऱ्या परराज्यातील महिलांना २४ तासाचे आत निष्पन्न करून मंगळसुत्र केले हस्तगत.
पत्रकार अब्दुल रहीम शेख कात्रज शहर अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
पुणे:-(आंबेगाव)-बतावणी करून मंगळसुत्र घेवून जाणाऱ्या परराज्यातील महिलांना २४ तासाचे आत निष्पन्न करून मंगळसुत्र केले हस्तगत.

आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि. १५/१०/२०२५ रोजी दुपारी १३/१५ वा सुमारास ओम किराणा मालाचा दुकाना समोर साई मित्र मंडळ गणपती मंदिरा शेजारी संतोषनगर कात्रज पुणे अनोळखी महिलांनी फिर्यादी यांना पिवळे धातुचे मनी देवुन ते सोन्याचे आहे असे भासवून ते फिर्यादी यांच्या मंगळसुत्रापेक्षा जास्त वजनाचे आहेत असे सांगून फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या गळयातील सोन्याचे मंगळसुत्र घेवून पळून गेल्याने आंबेगांव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर २६८/२०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८(४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदर महिलांचा आंबेगांव पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी कात्रज ते सासवड मार्गातील ५० पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून सदर आरोपीत महिला या सासवड येथे गेल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलीस अंमलदार प्रमोद भोसले यांना त्यांच्या बातमीदारामार्फत आरोपीत महिला राहत्या घरी असल्याचे माहिती मिळाल्याने पोउपनि मोहन कळमकर व पोलीस अंमलदार अजय कामठे, शिवाजी पाटोळे, महिला पोलीस अंमलदार दिक्षा मोरे असे त्यांच्या राहते घरी जावून सदर महिलांना त्यांना ताब्यात घेतले. महिला नामे १) आशाबेन मंगाभाई सरवय्या, वय ५० वर्षे, रा. नदी पत्रा जवळील पत्र्याचे रुम मध्ये भाडयाने जुना कोडीत रोड, तरकारी मार्केट जवळ, सासवड, जिल्हा पुणे मुळ रा. ढोला झोपडपटटी, भावनगर, गुजरात व २) सोनूबेन आकाशभाई सरवय्या, वय ३० वर्षे, रा. सदर यांना गुन्हयात अटक करून त्यांचेकडून फिर्यादी यांचे मंगळसुत्र हस्तगत केले. दाखल गुन्हयाचा पुढील तपास सहा पोलीस फौजदार शैलेंद्र साठे हे करीत आहेत.
नमुद महिला आरोपींकडुन खालील मंगळसुत्र जप्त करण्यात आले आहे.
१) १,०२,०००/- रु किंमतीचे ८ ग्रॅम वजनाचे एक चैनचे सोन्याचे दागिण्याचे दोन वाट्या असलेले मणी मंगळसुत्र जुवाकिअं
सदरची कारवाई मा. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा, सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. राजेश बनसोडे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, मा. मिलींद मोहिते, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-२ पुणे शहर, मा. राहुल आवारे, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस स्टेशनचे श्री. शरद झिने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गजानन चोरमले, पोलीस निरीक्षक (गुन्हे), पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर, तसेच पोलीस अंमलदार शैलेंद्र साठे, चेतन गोरे, हणमंत मासाळ, निलेश जमदाडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, प्रमोद भोसले, ज्ञानेश्वर चित्ते, नितीन कातुर्डे, योगेश जगदाळे, शिवाजी पाटोळे, अजय कामठे, सुभाष मोरे, हरिश गायकवाड, राकेश टेकवडे मपोशि दिक्षा मोरे यांच्या पथकाने केली.
(शरद झिने)
वरिष्ठ पोलीस निरीक्षक आंबेगाव पोलीस स्टेशन पुणे शहर




