कोपरगाव:-माजी मंत्री स्व.शंकररावजी कोल्हे साहेब यांचे प्रथम पुण्यस्मरण.
प्रतिनिधी आशितोष चव्हाण:-7378619519

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
मी अनुभवलेले कोल्हे साहेब !
प्रदिप माधवराव नवले,
चेअरमन, संजीवनी सहकारी पतसंस्था, कोपरगाव
🔥 आग न्यूज नेटवर्क
मी, नितीनदादा कोल्हे बालमित्र तसेच मी कोल्हे साहेबांचा फॅन असल्याने १९७२,१९७७ या निवडणुकांपासून मी त्यांच्या सहकाऱ्यांत कधी सामील झालो हे मला कळले नाही.
मी सनं १९८० मध्ये पिपल्स बॅंकेत नोकरीस लागलो. याकाळात कोणत्याही बॅंका कर्मचाऱ्यांना कर्ज देत नसल्याने मी, छगन साबळे बाबूशेठ वाणी यांच्यासह साहेबांना भेटलो. त्यांनी तातडीने सहकार निबंधकाकडून सर्व कायदेशीर पुर्तता करून पिपल्स बॅंक कार्यालय इमारतीमध्ये स्वत:चे हस्ते पिपल्स,गौतम, मर्चंट या तीन बॅंक कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थेच्या कामांचा श्रीगणेशा केला.गत दोन वर्षांपर्यंत कायम त्यांचे मार्गदर्शन लाभले.
२४ एप्रिल १९९४ ला पिपल्स बॅंक आगीत बेचिराख झाली. या घटनेची माहिती मिळताच कोल्हे साहेब बॅंकेची अर्धवट जळालेल्या कागदपत्रे व रजिस्टर गोळा करून मिळेल ती माहिती संकलित करण्याचे आदेश देऊन तातडीने संजीवनी सहकारी पतसंस्थेची दोन कोटी रूपयांची ठेव ठेवून इतरांना ठेवी ठेवण्यासाठी पुढाकार घेतला.या शिवाय पिपल्स बॅंकेत तारण सोन्याच्या तारणावर अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे तातडीने कर्ज मिळवून दिले. सर्व खातेदार व ठेवीदारांना कोणीही कोणत्याही परिस्थितीत घाबरू नका मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असा दिलासा दिला.या सर्व कामकाजात मी बॅंकेचा कामगार संचालक होतो., बॅंक संचालक.सर्वकर्मचाऱी कोल्हे साहेबांच्या सहकार्याची कायम ॠणी आहे.
सन २००४ साली मर्चंट बॅंक अवसायनात निघाल्यावर देवयानी बॅंकेच्या ठेवी विविध प्रकारे पैसा अडकला. यावेळी विरोधात देवयानी बॅंकेला संपवण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून बॅंक कामकाज कायदा कलम ३५(,अ) ची नोटीस बजावण्यात आली.
यावेळी रिझर्व्ह बँकेच्या दिवाण साहेबांशी माझी ओळख असल्या ने साहेबांनी नितीनदादा व अंबादास अंत्रे साहेबासह मला दिवाण साहेबांची भेट घेण्यासाठी सांगितले . या चर्चेत दिवाण साहेबांनी नवीन अनुभवी व अभ्यासू कर्तबगार मॅनेजर नेमा , तातडीने जास्तीत जास्त कर्ज वसुली करा. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार सर्व प्रकारच्या तरतुदी सह कामकाजात सुधारणा करा हा मोलाचा दिवाण साहेबांनी सल्ला दिल्यानंतर आम्ही नवीन मॅनेजर शोधत असतांना पद्माकर सभारंजक साहेब यांच्या बरोबर बॅंक कामगार व संचालक म्हणून कोल्हे साहेबांनी मला त्यांच्या बद्दल विचारणा केली. पिपल्स बॅंकेतील कार्याची दखल घेऊन कोल्हे साहेब यांनी देवयानी बॅंकेसाठी सभारंजक साहेब यांच्यावर जबाबदारी सोपवली
अल्पावधीतच कोल्हे साहेब यांनी देशात प्रथमच ३५(अ) कलमातून देवयानी बॅंक मुक्त केली. सर्व प्रकारची शासकीय ,
निमशासकीय व खासगी संस्था आणि व्यक्तीचीं देणी फेडण्यात गौरवशाली कामगिरी केल्यामुळे आज साई संजीवनी बॅंक अ वर्गातील बॅंक म्हणून कार्यरत आहेत.
या माझ्या कार्याची दखल घेऊन सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साहेब सहकारी साखर कारखाना संचालक , संजीवनी सहकारी पतसंस्था अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
अशा कर्तबगारी महान आत्म्यांचे चरणी भावपूर्ण श्रद्धांजली!!!