ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राहूल सावंत इंग्लिश मिडीयम स्कूल, थोरवेवाडी, पुसेसावळी मध्ये इयत्ता 10वी आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ सोहळा संपन्न.

प्रतिनिधी :- विनोद पाटील कराड :- 9762274165

राहूल सावंत इंग्लिश मिडीयम स्कूल, थोरवेवाडी, पुसेसावळी मध्ये इयत्ता 10वी आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ सोहळा संपन्न.

थोरवेवाडी, पुसेसावळी, ता. खटाव जि. सातारा येथील राहूल सावंत इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला.
सदर कार्यक्रम सोहळ्यात युनिटी शिक्षण संस्थेच्या सचिव सौ.अश्विनी सावंत, तसेच स्कूलचे प्राचार्य हेमंत जाधव, वैभव सूर्यवंशी सर व इतर मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. तसेच उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी स्कूल मध्ये असतानाचे अनुभव
सांगितले. इयत्ता 10वी मधील गुणवंत विद्यार्थी 1) फरहान अमीर मुलाणी 83.40% 2) तुषार आझाद शिंदे 78.20% 3) समर्थ रवींद्र वाघमारे प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण व इयत्ता 12वी चे विद्यार्थी 1) करण संजय पवार विशेष प्राविण्य मिळवुन उत्तीर्ण व इतर गुणवंत विद्यार्थी
2) कुमार विश्वास चव्हाण 3) पूनम प्रतिक मूळीक 4) रोहन मनीषकुमार पाटील 5) तनया दिपक देशमुख 6) उमाजी लाला बोडरे. या सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणी उत्तीर्ण झाले सदर विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमात प्रथम स्कूल मधील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गाऊन उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
सदर कार्यक्रमामध्ये शाळेच्या पर्यवेक्षिका सौ . कविता कदम व शिक्षक श्री.राहुल जाधव यांनी सुत्र संचालन केले. व शेवटी आभार प्रदर्शन शिक्षिका सौ.संगीता देशमुख यांनी केले. तसेच कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेतील इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सन 2022-2023 या वर्षाचे 11वी सायन्सचे प्रवेश सुरु असुन प्रवेशासाठी
संपर्क नं.
प्राचार्य हेमंत जाधव (7757811409)
प्रा.कविता कदम (9096048231)
प्रा. राहुल जाधव (7517727386)
अमोल गुरव (9881564426)

प्रतिनिधी -विनोद पाटील उपाध्यक्ष कराड तालुका

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button