आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राहता:-महात्मा गांधी कन्या विद्यालय दहावीतील विद्यार्थिनींसाठी शुभेच्छा समारंभ

प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

लोहगाव( वार्ताहर)
राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथील ;महात्मा गांधी कन्या विद्यालय,  येथे इयत्ता 10 वी तील विद्यार्थिनींसाठी शुभ चिंतन सोहळा मोठ्या आनंदात साजरा झाला .कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संकुलाचे माजी प्राचार्य मधुकर अनाप यांच्या उपस्थित संपन्न झाला.,
कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाच्या मुख्याध्यापिका  जे. के. कांबळे होत्या . माजी प्राचार्य. मधुकरअनाप  आणि विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती जे. के. कांबळे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले,तसेच जेष्ठ शिक्षक  डी. एन. माळी,. उज्वला रकटे आणि माधुरी भाग्यवान यांनी शिक्षक मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या .इयत्ता 10 वी च्या विद्यार्थिनींनी विद्यालयातील आपले अनुभव, आठवणींना उजाळा दिला व शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त केली .काही विद्यार्थिनी भाऊक झाल्या होत्या .
सदर कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता ९ वी तील विद्यार्थिनी आणि त्यांचे वर्गशिक्षक   प्रफुल नव्हाळे यांनी विशेष परिश्रम घेऊन केले . या प्रसंगी शिक्षकवृंद आणि इयत्ता ९वी, १०वी च्या विद्यार्थीनी उपस्थित होत्या .
भक्ती नरोडे, वेदांती कडू आणि सायली थोरात यांनी सूत्रसंचालन केले व शेवटी गायत्री वाघ हिने सर्वांचे आभार मानले .
शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button