पुणे:-स्टार प्रचारकांसाठी हेलिकॉप्टर आरक्षण तेजीत…
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
स्टार प्रचारकांसाठी हेलिकॉप्टर आरक्षण तेजीत…
पुणे दि: आगामी लोकसभा निवडणुकीत देशभरात बिगुल वाजले आहेत. प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून आता प्रत्यक्षात अर्ज दाखल करणे व प्रचाराला सुरुवात होण्यापूर्वीच सध्या स्टार प्रचारकांसाठी राजकीय पक्षाने खाजगी हेलिकॉप्टर बुकिंगला सुरुवात केली आहे. सर्वाधिक हेलिकॉप्टर हे पुण्यात असून महायुतीच्या नेत्यांसाठी त्यानंतर इतरांसाठी हेलिकॉप्टर भाड्याने आगाऊ रक्कम देऊन आरक्षित होत आहे. अशी माहिती हाती आलेली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातही हेलिकॉप्टरची भिरकिट सुरू होणार असली तरी मतदान नेमके कुणाला होईल ? हे सांगणे सध्या तरी कठीण आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सध्या वेळेचे बंधन पाळावे लागत असून अनेक ठिकाणी वाहतुकीला अडथळे होत असल्याने व वेळेत सभासदांनी पोहोचण्यासाठी हेलिकॉप्टर हे महत्त्वाचे साधन आहे. हेलिकॉप्टरचा वापर हा वैद्यकीय तसेच पर्यटन आणि श्रीमंतांच्या लग्न सोहळ्यासाठी केला जातो. पण, आता निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये आत्तापर्यंत किमान २५० हेलिकॉप्टर आगाऊ भाडे भरून आरक्षित करण्यात आलेली आहेत. महाराष्ट्रातील 48 लोकसभेच्या मतदार संघामध्ये ग्रामीण भागामध्ये हेलिपॅडच्या बाबत आता विचारना होऊ लागलेली आहे.
वास्तविक पाहता हेलिकॉप्टर पुरवठा करणाऱ्या खाजगी कंपनी या ४०० ते ४५० तास हेलिकॉप्टर वापरल्यानंतर ते इतरांकडे देतात. यामध्ये हेलिकॉप्टरच्या पायलट सोबत दोन आसन पासून ते सहा आसन, बारा आसन अशी क्षमता आहे. त्यामध्ये जर पाहिलं तर नेते, अधिकृत उमेदवार व स्टार प्रचारक अशाच मंडळींना हेलिकॉप्टरचा प्रवास करण्याशिवाय गत्यंतर नाही.
एका तासासाठी ६० ते ७० हजार रुपये आकारणी केली जात आहे. किमान एका सभेसाठी एक तासाचा अवधी जर पकडला तर सरासरी तीन साडेतीन लाख रुपये हे खर्च करावे लागतात. हेलिकॉप्टरची संख्या पाहता नागरी विमान वाहतूक महासंचालकाच्या माहितीनुसार ३०० हेलिकॉप्टर आतून २२ हे राज्य सरकारच्या मालकीचे आहेत. तर इतर ८२ विविध कंपन्यांच्या मालकीची हेलिकॉप्टर आहेत. उमेदवाराची खर्चाची मर्यादा ती ९५ लाख रुपये असल्यामुळे किमान एका मतदारसंघात हेलिकॉप्टरच्या दहा ते बारा फेऱ्या पूर्ण करू शकतात. या हेलिकॉप्टर साठी वेगळे इंजन वापरावे लागते. त्यामुळे किमान हेलिकॉप्टर ५० ते ६० लिटर मध्ये एक तास हवेत फिरू शकते. त्यानंतर त्याच्यात इंधन भरणे आवश्यक आहे.
सध्या तसं पाहिलं तर स्टार प्रचारक म्हणून सिने अभिनेता अभिनेत्री, सेलिब्रिटी,नरेंद्र मोदी, अमित शहा, नितीन गडकरी, उध्दव ठाकरे, संजय राऊत, सुषमा अंधारे, राहुल गांधी, सोनिया गांधी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार, शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, अकबरुद्दीन ओवीसी, नारायण राणे, नाना पटोले, चंद्रकांत पाटील, अशोक चव्हाण अशी भली मोठी महाराष्ट्रातील नावे आहेत. या नेत्यांचा प्रभाव असलेल्या मतदारसंघात त्यांच्यासाठी खास हेलिकॉप्टरची व्यवस्था करणे. यासाठी आता लक्ष केंद्रित केले जात आहे.
पुणे जिल्ह्यात सर्वाधिक हेलिकॉप्टर असून आगाऊ रक्कम देऊन आरक्षित केले जात आहे. नामांकित अशा कंपन्यांमार्फत दररोज हेलिकॉप्टरच्या आरक्षणाबाबत विचारणा होत असून बेल एअर बस, ऑगस्ट बेसला, पवनहंस, बाली अशी ताशी ३२० हवाई किलोमीटरने प्रवास करणारे हेलिकॉप्टर आहेत. त्यामुळे सेलिब्रिटी व नेत्यांना हेलिकॉप्टर मधून अनेक सभा गाठता येऊ शकतात.
तसं पाहिलं तर हेलिकॉप्टरचा प्रवास हा सुखकर व आरामदायक आहे. तसेच वेळेची बचत होत आहे. परंतु आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय एस राज शेखर रेड्डी, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री दोरजी खंडू यांचा विमान अपघातात अंत झाला होता. अलीकडच्या काळामध्ये अपघाताचे प्रमाण कमी झाले असून सध्या हवामान व वातावरण सुद्धा अनुकूल आहे. त्यामुळे आता आकाशात सुद्धा प्रचारानिमित्त हेलिकॉप्टरच्या गिरट्या वाढणार आहेत. पण या हेलिकॉप्टरच्या गिरट्यामधून कोणता नेता कोणत्या सभेसाठी जाणार आहे. हे मात्र जमिनीवर असणाऱ्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना समजण्यासाठी हेलिकॉप्टर लँड होणे गरजेचे आहे. तोपर्यंत प्रतीक्षा आता करावी लागणार आहे.
किमान पाचशे कोटी रुपये हे हवाई प्रवासासाठी खर्च होतील. असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अलीकडच्या काळामध्ये प्रचार यंत्रणा राबवताना आता हेलिकॉप्टर व आधुनिक यंत्रसामुग्री ड्रोन चा वापर केला जात आहे. त्यामुळे बदलत्या विज्ञानानुसार आता कोणत्या मुहूर्तावर अर्ज भरावा ? यासाठी आता आध्यात्मिक गुरूकडेही काहीजण जात आहेत. त्यामुळे विज्ञान व अध्यात्मिक याची सांगड घालूनच निवडणुकीत प्रचार करतील .त्याचा लोकशाहीमध्ये विजय निश्चित मानला जात आहे. अशी भाबडी आशा काही कार्यकर्त्यांना वाटू लागली आहे.
————————————————– चौकट-लोकसभा निवडणुकीमध्ये काही ठिकाणी नेते हेलिकॉप्टर मध्ये आले पण सहभाग घेऊनही उमेदवाराचा पराभव झाला होता त्यामुळे हेलिकॉप्टर मधून प्रचार यश मिळवून देते असं काही नाही कारण हिंदी चित्रपटातील गाणे आहे .आसमान से आया फरिश्ता ..पण हा फरिश्ता मतदारांनाही भावना पाहिजे हे मात्र सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर अससोसिएशन
———————————————–
फोटो -अशी अनेक हेलिकॉप्टर प्रचारासाठी सज्ज झालेले आहेत (छाया- निनाद जगताप, सातारा)