पुणे पिंपरी:-चिंचवड पोटनिवडणुकीत पाठिंबा देण्याच्या निर्णयात बहुमताला का ‘वंचित’ ठेवण्यात आले?
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
चिंचवड पोटनिवडणुकीत पाठिंबा देण्याच्या निर्णयात बहुमताला का ‘वंचित’ ठेवण्यात आले?
पिंपरी, दि. 18 (शफिक शेख) :- चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये कोणाला पाठिंबा देण्यात यावा याकरिता वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिक-यांची दिनांक 14 रोजी गुप्त बैठक झाली. त्यामध्ये हात वर करून मतदान घेण्यात आले की कोणाला पाठिंबा देण्यात यावा मविआ किंवा राहुल कलाटे किंवा इतर. यावेळेस असे निदर्शनास आले की 54 पदाधिक-यांपैकी 34 जणांनी महाविकास आघाडीसाठी हात वर केले तर 16 जणांनी राहुल कलाटे यांच्यासाठी आपले हात वर केले तर 4 जण हे तटस्थ राहिले त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
हा सर्व प्रकार होवूनही दिनांक 16/2/2023 रोजी ‘वंचित’च्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी प्रेस नोटद्वारे कळविले की, आम्ही चिंचवड पोटनिवडणुकीत राहुल कलाटे यांना पाठिंबा देणार आहोत. जर बहुमताविरोधात जर निर्णय द्यायचा होता तर मग वंचितची ती बैठक आणि ती धावपळ ही फोल ठरली का? कारण पक्षश्रेष्ठींकडून आदेश होता की स्थानिक कार्यकारिणीने घेतलेला निर्णय आम्हाला म्हणजेच वरिष्ठ कार्यकारिणीलाही मान्य असेल. परंतु केवळ वैयक्तिक लाभापोटी वरिष्ठ कार्यकरिणीने 34 / 16/4 असा कल असताना काय पाहून राहुल कलाटे यांच्या हातात हात दिला, असे वंचितच्या कार्यकत्यांमधून बोलून दाखविले जात आहे आणि याचमुळे वंचितमध्ये संभ्रमाची स्थिती असताना असेही ऐकण्यात येत आले की वंचितमध्ये गटातटाचे राजकारण वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याच्यापुढे जावून काही कार्यकारिणी सदस्यांनी आपसांत चर्चा सुरू केली पण आम्ही विचारले असता त्यांनी नाव न सांगण्याच्या शर्तीवर एका जुन्या गाण्याचे काही बोल सांगितले .
दुखी मन मेरे, सुन मेरा कहना
जहां नही चैना, वहां नही रहना !