फलटण:-राष्ट्रमाता छत्रपती जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंती दिनी फलटण येथे अभिवादन.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
राष्ट्रमाता छत्रपती जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंती दिनी फलटण येथे अभिवादन.
फलटण
स्वराज्याची संकल्पना मांडून ती सत्यात उतरवण्यासाठी राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर राष्ट्रप्रेमाचे व राष्ट्रधर्माचे संस्कार केले रयतेचे राज्य असावे यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम आजही प्रेरणादायी आहेत अठरापगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन स्वराज्याची स्थापना करताना छत्रपती शिवाजीराजेंना मार्गदर्शक म्हणून छत्रपती जिजाऊ माँ साहेबांनी केलेलं मार्गदर्शन रयतेच्या हिताचे होते असे मत श्री गोविंद भुजबळ यांनी फलटण येथील सावतामाळी मंदिर येथे छत्रपती जिजाऊ यांना जयंती निमित्त अभिवादन करताना व्यक्त केले.
या वेळी संत सावतामाळी मंदिरचे विश्वस्त विजय शिंदे ,विडणीचे माजी सरपंच शरद कोल्हे , कोळकीचे तंटा मुक्ती अध्यक्ष पै दत्तानाना नाळे जाधववाडी ग्रा पं सदस्य राहुल शिंदे, फरांदवाडी ग्रा पं सदस्य बंडू शिंदे , अमोल शिंदे शनेश शिंदे विकास शिंदे वैभव नाळे इत्यादी उपस्थित होते.