श्रीरामपूर:-(माळेवाडी)-“मेहनत, जिद्द आणि स्वप्नांची गरुडझेप – अमृतेश्वर विद्यालयाची विद्यार्थिनी पुणे पोलीस दलात!”

“मेहनत, जिद्द आणि स्वप्नांची गरुडझेप – अमृतेश्वर विद्यालयाची विद्यार्थिनी पुणे पोलीस दलात!”

श्रीरामपूर / माळेवाडी (RPs स्टार न्यूज प्रतिनिधी)
अमृतेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, संगमनेर खुर्द यांच्या शिरपेचा मान उंचावणारी आणखी एक अभिमानास्पद कामगिरी समोर आली आहे. विद्यालयातील मेहनती, हुशार आणि कष्टाळू विद्यार्थिनी आरती बाबासाहेब पानसरे हिची पुणे पोलीस दलामध्ये यशस्वी भरती झाली आहे.
आरतीने आपल्या अथक परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि जिद्दीच्या बळावर हे यश संपादन केले आहे. कुटुंबीयांचे मार्गदर्शन आणि शिक्षकांचे सहकार्य यामुळे तिने खडतर प्रवास करत उज्वल यश गाठले. तिच्या या यशामुळे विद्यालयाचे तसेच संपूर्ण परिसराचे नाव अभिमानाने उजळले आहे.
आरतीची ही यशस्वी झेप म्हणजे केवळ सुरुवात असून, ती पुढेही अशीच गरुडझेप घेत पोलीस दलामध्ये उच्च पदांवर पोहोचेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
🎉 आरती पानसरे हिला तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन! 🎉
शुभेच्छुक:
चेअरमन, सर्व संचालक मंडळ,
अमृतेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,
मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थीवृंद.




