ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
राहता:-तांबेनगरच्या म्हसोबा महाराजाची यात्रोत्सव उत्साहात साजरा.
प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
लोहगाव (वार्ताहर )कोडीराम नेहे
राहाता तालुक्यातील लोहगाव
( तांबेनगर)येथील म्हसोबा महाराज यात्रा उत्सव धुमधडाक्यात पार पडला.
या यात्रा उत्सवास पंचक्रोशीतील हजारो नागरिकांनी हजेरी लावली आकर्षण विद्युत रोषणाई व सुयोग नियोजन हे यावर्षीचे यात्रेचे आकर्षण ठरले. सकाळी गोदावरी पुणतांबा येथून आणलेल्या पाण्याचे मिरवणूक करत म्हसोबा महाराजांना स्नान करण्यात आले. सकाळी अभिषेक करण्यात आला.
सालाबाद प्रमाणे ५ फेब्रुवारी रोजी लोहगाव तांबेनगर येथील म्हसोबा महाराज यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला मंदिरात विद्युत रोषणाई आकर्षण ठरली मंदिर व परिसरात केलेले आकर्षण विद्युत रोषणाई भाविक भक्तांनी आकर्षित करीत सहभाग घेतला सायंकाळी काठीची मिरवणूकीत सर्वांनी सहभाग घेतला फटाक्याची आतिषबाजी डीजेच्या तालावर महिला बालगोपाल तसेच पुरुषांनी थरारक केला. यात्रा उत्सव निमित्त लोहगाव ग्रामपंचायतचे नवनिर्वाचिक सरपंच .उपसरपंच .व ग्रामपंचायतचे सदस्य यांचे यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यात्रा उत्सवात महिला भगिनी जास्त प्रमाणात उपस्थित होत्या.