सातारा:-ऑनलाइन आरटीई प्रवेश अर्जांना सुरुवात.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष
RPS STAR NEWS
ऑनलाइन आरटीई प्रवेश अर्जांना सुरुवात.
सातारा:- शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकांकरिता खाजगी शाळांमधील 25% राखीव जागांसाठी ऑनलाइन आरटीई प्रवेश प्रक्रिया 14 जानेवारीपासून सुरुवात झाली असून दुर्बल वंचित आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागास घटकातील बालकांना स्वयमअर्थसाहित शाळा, विनाअनुदानित शाळा, पोलीस कल्याणकारी शाळा ( विनाअनुदानित ) व नगरपालिका शाळा( स्वयम अर्थसाहित शाळा) शाळांमध्ये इयत्ता 1ली साठी ऑनलाइन प्रक्रिया सुरू झाली असून पालकांनी https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी.
त्यासाठी लागणारे कागदपत्रे पुढीलप्रमाणे:-
•पालकांचा वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमीचा दाखला तहसीलदार किंवा तत्सम अधिकारी यांचा दाखला.
• निवासी पुरावा म्हणून रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, विज देयक, टेलिफोन देयक, प्रॉपर्टी टॅक्स देयक, घरपट्टी, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट व राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येईल.
• जन्मतारखेचा पुरावा म्हणून ग्रामपंचायत, मनपा, नगरपंचायत यांचा दाखला.
• सामाजिक वंचित जात प्रवर्गातील बालकांसाठी वडिलांचा तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय महसूल अधिकारी यांनी निर्गमित केलेला जातीचा दाखला.
• दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र जिल्हाशल्य चिकित्सक, वैद्यकीय अधीक्षक यांचा 40% पेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र
• अनाथ बालके यांच्यासाठी अनाथालयाची किंवा बालसुधारगृहाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येतील.
• विधवा महिला असतील पतीचे मृत्यू प्रमाणपत्र, आईचा रहिवासी पुरावा व बालकाच्या आईच्या उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्रे दाखल करणे अनिवार्य राहील.*
सदर अर्ज ऑनलाइन अर्ज भरण्याची तारीख 14.01.2025 ते 27. 01.2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.