वाई:-भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदू रत्न पुरस्काराने श्री अजित क्षीरसागर सन्मानित.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदू रत्न पुरस्काराने श्री अजित क्षीरसागर सन्मानित.

वाई : लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त तसेच राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी पद्मश्री मनीभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट (नीती आयोग भारत सरकार दिल्ली संलग्नीत शासन मान्य), आय.एस.ओ. मानांकन प्राप्त उरुळी कांचन तर्फे आयोजित भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल पुण्याच्या राज्यसभेच्या खासदार सौ. मेघाताई कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या सोहळ्याचे मुख्य आयोजक डॉक्टर रवींद्र भोळे व मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. हा भव्य सोहळा लोकशाहीर आण्णाभाऊ साठे सांस्कृतिक हॉल, येरवडा, पुणे येथे संपूर्ण भरलेल्या प्रेक्षाग्रहात संपन्न झाला.
याप्रसंगी प्रथम सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या शुभहस्ते पूजन करण्यात आले. भारतातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना “भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदूरत्न 2025” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याचवेळी वाईतील श्री. अजित क्षीरसागर, यांनाही त्यांच्या सामाजिक आणि साहित्यिक कार्याचा आढावा घेऊन *हिंदुरत्न पुरस्कार 2025* या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
श्री अजित क्षीरसागर यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान तसेच साहित्यिक क्षेत्रातील योगदान याचा आढावा घेऊन या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली होती. श्री. अजित क्षीरसागर हे बऱ्याच सामाजिक उपक्रमात सहभागी असतात. ते लोकमान्य स्मारक संस्थेच्या वसंत व्याख्यानमाला वाईचे, सहकार्यवाह म्हणून काम पाहतात. महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा वाईचे ते सचिव आहेत. त्याचबरोबर त्यांनी रोटरी क्लब ऑफ वाईच्या सचिव, अध्यक्ष व उपप्रांतपाल पदाच्या जबाबदार्याही पार पाडल्या आहेत. भारतीय युवा शक्ति ट्रस्ट, वाई चॅप्टर चे ते मुख्य मेंटर म्हणून भूमिका बजावत समाजातील तरुणांना उद्योगासाठी सहकार्य करतात व प्रेरित करीत असतात. आजपर्यंत त्यांची 3 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांची पुढील वाटचालही यशस्वी व्हावी यासाठी त्यांना त्यांच्यास शुभ चिंतकानी शुभेच्छा दिल्या.




