सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत 73 लिपिक पदांची भरती.
पत्रकार शैलेश मेस्त्री सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत 73 लिपिक पदांची भरती.
“कोकणात नोकरीची संधी नसल्यामुळे बेरोजगारांचा लोंढा मुंबईला जातो, मिळेल ते काम करतो, हे जरी खरे असले तरी सुशिक्षित युवक युवतींना कोकणातच नोकरी मिळावी, यासाठी अत्यंत क्रांतीकारक निर्णय घेणा-या ज्या काही संस्था आहेत, त्यात आवर्जुन नाव घ्यावे लागेल ते सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत तब्बल ७३ लिपिक पदांच्या जम्बो भरतीला राज्याच्या सहकार विभागाने हिरवा कंदील दिला आहे. या भरतीत जिल्ह्यातील उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. तशी परवानगी घेण्यात आल्याचे जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी सांगितले आहे. पद भरती आणि स्थानिकांना संधी हे त्यांचे दोन्ही निर्णय स्वागतार्हच आहेत. जिल्हा बॅंकेने उचललले पाऊल फक्त क्रांतीकारकच नाही तर सिंधुदुर्ग जिल्हयाला एक नवी दिशा दाखवणारे आहे. हाच आदर्श समोर ठेवत जर जिल्ह्यातील अन्य सरकारी, सहकारी, खासगी संस्थांनी स्थानिकांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला तर निश्चितच येत्या काही वर्षात कोकणचे चित्र पालटल्याशिवाय राहणार नाही.