ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुणे निगडी:-परंपरा दहा वर्षांची; परंपरा तन्वीर चिकनच्या माणुसकीची.

प्रतिनिधी शफीक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483

परंपरा दहा वर्षांची; परंपरा तन्वीर चिकनच्या माणुसकीची.
निगडी, दि. 3 (शफिक शेख) :- आजच्या या महागाईच्या काळात जेथे सर्वत्र माणुसकीचा तुटवडा जाणवत आहे. अशा या काळामध्ये मागील सुमारे 10 वर्षांपासून तन्वीर चिकनचे मालक आणि एमआयएम पक्षाचे पिंपरी चिंचवड सचिव कुतुबुद्दीन होबळे हे आणि त्यांचा पूर्ण परिवार हा माणुसकीचा वारसा जोपासत आहेत.
सेक्टर नंबर 22 येथील स्वामी समर्थ भाजीमंडई येथे होबळे यांचे तन्वीर चिकन नावाचे दुकान आहे. या दुकानावरच ते प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला सुमारे 150 कुटुंबांना अन्नदानाचे अनमोल कार्य करीत आहेत. मागील 10 वर्षांपासून यामध्ये कधीही खंड पडला नाही. या 150 कुटुंबांमध्ये सर्व कुटुंबे ही अंध, अपंग, निराधार, विधवा स्त्रिया आणि गोरगरीब अशी आहेत. होबळे यांच्या या कार्यात त्यांचे पुत्र तन्वीर होबळे आणि त्यांचा पूर्ण परिवार त्यांचे सहकार्य करीत आहेत.
सेक्टर नंबर 22 येथे अंध आणि अपंग नागरिकांची संख्या जास्त आहे त्यामुळे त्यांचे दुःख काही अंशी कमी करता यावे म्हणून मागील दहा वर्षांपासून मी प्रयत्नशील आहे, असे कुतुबुद्दीन होबळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. येथील नागरिकांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, दर महिन्याच्या 1 तारखेला न चुकता येथे अन्नदानाचे पवित्र कार्य हे अविरत चालू असते. येथे केवळ व्यवसाय होत नसून माणुसकी जपण्याचे अनमोल कार्यही येथे केले जाते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button