साताऱ्यात दिव्यांग बांधवांच्या दिवाळीसाठी नगरसेवक बाळासाहेब खंदारे बनले दिपज्योत…
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
साताऱ्यात दिव्यांग बांधवांच्या दिवाळीसाठी नगरसेवक बाळासाहेब खंदारे बनले दिपज्योत…

सातारा दि: दिन दिन दिवाळी, गाय म्हशी ओवली, गाय म्हशी कोणाच्या? लक्ष्मणाच्या,, लक्ष्मण कोणाचा आई वडिलांचा .. या वाक्याची आठवण करून देऊन साताऱ्यातील दानशूर नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांनी लक्ष्मणाच्या रूपाने दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेला दिवाळी भेट व कपडे देऊन खऱ्या अर्थाने माणुसकीचा दीपज्योत पेटवली आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कृपादृष्टीने अनेकांची दिवाळी साजरी करण्याचे भाग्य लाभले.
दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्था सातारा यांच्या कार्यालयामध्ये सर्व दिव्यांग बांधव एकत्र येऊन सामाजिक जाणीव ठेवतात. तसेच दिव्यांग बांधवांसाठी असलेल्या शासकीय योजना राबवण्यासाठी सहकार्य करतात. अशा दिव्यांग 200 बांधवांसाठी सातारचे कर्तबगार नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांच्या दानशूर पणामुळे दिवाळी साजरी झाली आहे. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू झाल्यामुळे समाज माध्यमावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशा या काळात आधी केले… लोकांना दाखवून दिले… पण, कुणालाही सांगितले नाही. असा स्वाभिमानी बाणा नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांनी दाखवून दिला आहे. शुभेच्छा द्यायचे असेल तर सरळ हाताने भेटवस्तू देऊनच शुभेच्छा द्याव्यात. फॉरवर्ड मेसेज मुळे कुणालाही लाभ होत नाही. असा नवा संदेश दिला आहे.
सातारा शहरातील अनेक नामावंत लोकांनी घरातील कुटुंबियाचे दिवाळी साजरी केली. परंतु नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांनी दिव्यांग बांधवांसोबत दिवाळी साजरी करून माणुसकीची ही फटका फोडला आहे. त्यांच्या मतदारसंघातही अनेक गोरगरीब हे आनंदाने दिवाळी साजरी करत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने सातारातील माणुसकी जिवंत ठेवण्याचे काम नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांनी केले आहे. असे गौरव उद्गागार दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अजय पवार व अमोल निकम यांनी या भेटवस्तू प्रदान कार्यक्रमात काढले. छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले व नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे दोन्ही बंधू यांचे मन राजासारखे असून त्यांच्यासाठी आम्ही दुवा करत आहे. त्यांचा सच्चा मावळा म्हणून नगरसेवक बाळासाहेब खंदारे हे कार्य करत आहेत. त्यांनाही सर्व समाजाने सहकार्य करावे. असे स्पष्ट करण्यात आले. यावेळी दिव्यांग बांधव अजय पवार ,अमोल निकम, अमोल भातुसे, शैलेंद्र बोर्डे, पांडुरंग शेलार, संतोष गलांडे, समीना शेख , शांताराम देवरे प्रेमनाथ कदम, सुरेश माने, माधुरी देशमुख, शोभा मोरे, धर्मेंद्र कांबळे,बाळासाहेब रवले,लतिका जगताप यांच्यासह अनेकांना भेटवस्तू कपडे दिल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर समाधान पसरले. या दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेला अनेकदा ताज भाई मित्र मंडळाच्या वतीने ही सहकार्य लाभलेले आहे. या विजय उपक्रमाबद्दल दिव्यांगांचे हृदय सम्राट विशाल कदम यांनी आभार मानले आहेत.




