सिल्लोड :-खुपटा ग्रामपंचायतचा मनमानी कारभार- ढिसाळ नियोजनामुळे अनेक योजनांपासून गावकरी वंचीत.
पत्रकार गजानन काळे छ. संभाजीनगर जिल्हा संघटक.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार गजानन काळे छ. संभाजीनगर जिल्हा संघटक.
खुपटा ग्रामपंचायतचा मनमानी कारभार-
ढिसाळ नियोजनामुळे अनेक योजनांपासून गावकरी वंचीत.
प्रतिनिधी:-सिल्लोड तालुक्यातील खुपटा गाव गावकऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालयाच्या ढिसाळ नियोजनाचा चांगलाच फटका बसताना दिसते आहे.ग्रामपंचायत कार्यालयाचे कोणत्याच विकास कामांवर लक्ष नसून,गावातील मूलभूत गरजा नागरिकांना पुरविण्यात ग्रामपंचायत स्पेशली अपयशी ठरलाचे प्रथमदर्शी लक्ष्यात येते.ना कुठल्या मासिक सभा ना कुठल्या योजनेचे नियोजन, ना कोणती ग्रामसभा14/15व्या वित्त आयोगातून सुद्धा कोणत्याच योजनेचा लाभ ग्रामपंचायत कार्यालयाला मिळवता आलेला नाहीये.गतवर्षी इंदिरा आवास योजने अंतर्गत मजूर झालेल्या अनेक घरकुलांचे अपूर्ण असून अंतर्गत रस्ते सुद्धा अपूर्ण अवस्थेत आहे.पावसाळ्यात अनेक ठिकाणी पानांचे डबके साचण्याने जणू रोगराईला आमंत्रण दिल्याचे दिसून येते.कुठल्याही प्रकारची फवारणी किंवा विशेष लसीकरण कोणत्याच प्रकारची सुविधा नागरिकांना मिळत नसल्याने गावकर्यांध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.