पाचगणी:-पाचगणीतील गांधी आठवणीचे हिंद निवास आता इतिहास जमा होणार..
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
पाचगणीतील गांधी आठवणीचे हिंद निवास आता इतिहास जमा होणार..

पाचगणी : थंड हवेचे ठिकाण असलेल्या पाचगणी पर्यटन स्थळाला अनेक निसर्गरम्य स्थळ आहेत त्याचप्रमाणे ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या काही खूण आहेत. त्यापैकी १९४६ साली बांधलेले हिंद निवास आता पाचगणी नगरपालिकेची नोटीस आल्यामुळे उतरवण्याचे काम सुरू आहे. लवकरच हिंद निवास इतिहास जमा होणार असल्याने या ठिकाणी नवीन काय निर्माण होते? याच्याबाबत उत्सुकता लागलेली आहे.
या बाबत माहिती अशी की, पाचगणी शहरातील हिंद निवास ही स्वातंत्र चळवळीत योगदान देणारे थोर स्वातंत्र्य सेनानी बी आर ओंबळे यांच्या मालकीची आहे .पांचगणी नगरपालिका हद्दीत असणारी वास्तू रहिवास करण्यासाठी धोकादायक असल्याचे नोटीस पाचगणी पालिकेने बजावले आहे. तसेच ही इमारत उतरवण्याचे काम सुरू झालेले आहे. त्यामुळे या परिसरातून ये जा करणाऱ्या नागरिकांनी याची नोंद घ्यावी. यासाठी फलक लावण्यात आलेला आहे.
सातारा जिल्हा बँकेचे माजी संचालक व महाबळेश्वर पंचायत समितीचे माजी सभापती कै. बी आर ओंबळे यांचे मालकीची आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पाचगणी येथील वास्तवाच्या खुणा जपणारी ही इमारत आहे . १९४६ साली महात्मा गांधी यांनी पाचगणी येथे वास्तव्य केले होते. त्यावेळी त्यांनी या वास्तूला भेट दिली होती. अशा आठवणी ऐकण्यास मिळत होत्या.
या वास्तूचे वारसदार श्रीमती क्रांती ओंबळे – मांढरे यांची गावठाण, हनुमान रोड पांचगणी येथील इमारत खूप जुनी असून ती सध्या धोकादायक बनली आहे. याबाबत पालिकेने या इमारतीचा स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी रिपोर्ट श्रीराम कुलकर्णी यांच्याकडून घेतला. त्यानुसार पालिकेने लागलीच या धोकादायक इमारतीचा रहिवास वापर बंद करावा आणि धोकादायक इमारत उतरवून घ्यावी. असे नोटीस पालिकेने जागा मालक क्रांती ओंबळे मांढरे यांना बजावली. त्यानुसार या इमारतीचे बांधकाम पाडण्याचे काम होत आहे.
पाचगणी पालिकेने पावसाळ्यापूर्वी धोकादायक मिळकतीचा वापर पुर्णपणे बंद करावा. आणि हिंद निवास इमारत उतरवून घ्यावी. अन्यथः महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमान्वये पुढील कार्यवाही करणेत येईल. असे पाचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी नोटीसात म्हटले आहे. सदर इमारतीच्या बाहेर ही तशा आशयाचे नोटीस इमारतीबाहेर लावली आहे.
RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन
__________________________________
कै. बी आर ओंबळे यांच्या मालकीची ही धोकादायक इमारत (छाया- रविकांत बेलोशे, पाचगणी)