विटा:-शिवप्रताप मल्टीस्टेट संस्था आगामी काळात एक हजार कोटीचा व्यवसाय करणार___प्रताप शेठ दादा साळुंखे.
प्रतिनिधी प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
शिवप्रताप मल्टीस्टेट संस्था आगामी काळात एक हजार कोटीचा व्यवसाय करणार___प्रताप शेठ दादा साळुंखे.
मायनी प्रतिनिधी__विश्वासार्थेचा ब्रँड असलेल्या शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या नूतन मालकीच्या इमारतीचा व विटा शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या शिवप्रताप गोल्ड टावर या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा शाही थाटात विटा येथे संपन्न झाला या वास्तूचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक चेअरमन प्रताप शेठ दादा साळुंखे यांच्या हस्ते संपन्न झाली यावेळी आमदार शिवाजीराव कदम जत आमदार विक्रम दादा सावंत सांगली जिल्हा राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक महिला काँग्रेसचे अध्यक्ष जयश्रीताई पाटील मालन ताई मोहिते सौ सुजाता साळुंखे विटाचे माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील मानसिंग बँकेचे प्रमुख जे के बापू यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी मान्यवरांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन नागरी सत्कार करण्यात आला आपल्या उद्घाटन पर भाषणात प्रताप शेठ साळुंखे दादा यांनी सांगितले की ११ जुलै 2002 मध्ये दुष्काळी परिस्थिती असताना या संस्थेचे रोपटे लावले आज महाराष्ट्रात व कर्नाटकात एकूण पंधरा शाखा आहेत लवकरच बारा शाखा सुरू करणार असून आगामी काळात एक हजार कोटीचा व्यवसाय करणार करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून ही संस्था राजकीय अभिनवेश बाजूला ठेवून सभासद हा केंद्रबिंदू मानून काम करणारी आहे प्रारंभी संस्थेचे कार्यकारी संचालक विठ्ठल साळुंखे यांनी पंधरा शाखेच्या कार्याचा आढावा घेऊन संस्थेत एचआर मार्केटिंग ऑडिट रिसर्च अँड डेव्हलपमेंट डाटा परीक्षण इत्यादी विभाग सुरू केली असून तज्ञ व्यक्तीची निवड केली आहे त्यामुळे सभासदांना जलद आणि विश्वास पूर्ण सेवा मिळणार आहे या संस्थेत सभासद विश्वासाने ठेव ठेवतात यांचा मला अभिमान आहे या कार्यक्रमास दिलीप कांबळे संभाजी जाधव प्रल्हाद शेट्टी शरद पवार विश्वनाथ कुंभार शशिकांत अष्टेकर राजू पाटील सुरेश देशमुख पत्रकार दिलीप पुस्तके झुंजार ठोंबरे जगदीश टिंगरे राजेंद्र माने अशोकराव पाटील प्रमोद भंडारे किरण वाळवेकर शिवाजीराव माने तसेच सांगली सातारा जिल्ह्यातील बहुसंख्य सभासद हितचिंतक ठेवीदार उपस्थित होते शेवटी पाटील साहेब यांनी आभार मानले.