पुणे:-चौथी व सातवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा सुरू.
पत्रकार विनोद पाटील

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

चौथी व सातवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा सुरू.

पुणे:- महाराष्ट्र राज्य सरकारने शैक्षणिक वर्ष २०२५–२६ पासून इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून राबवली जाणार आहे.
यापूर्वी ही शिष्यवृत्ती परीक्षा केवळ इयत्ता पाचवी व आठवीसाठी घेतली जात होती. मात्र नव्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता लहान वयातच ओळखता येणार असून, स्पर्धात्मक अभ्यासाला चालना मिळणार आहे.
या परीक्षेत भाषा, गणित आणि बुद्धिमत्ता या विषयांवर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत. चौथीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी ५ हजार रुपये, तर सातवीच्या विद्यार्थ्यांना ७ हजार ५०० रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे ग्रामीण व शहरी भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार असून, परीक्षेचे वेळापत्रक व अर्ज प्रक्रिया लवकरच राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत वेबसाइट वरती 30 डिसेंबर पासून परीक्षा फॉर्म भरण्याची सुविधा खालील लिंक वर दिली आहे. https://www.mscepune.in तरी सर्व विद्यार्थी व पालकांनी याची नोंद घ्यावी अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली आहे.




