भोर:-चक्क सायलकलीवर केले 1200km पुर्ण .तिरूपती बालाजी चे दर्शन.
प्रतिनिधी वैष्णवी शिंदे पुणे:-9146802009

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
चक्क सायलकलीवर केले 1200km पुर्ण .तिरूपती बालाजी चे दर्शन.
पुणे भोर तालुक्यात राहणार्या एका अभिषेक सूर्यकांत माने 24-25 वय असलेल्या युवकाने पुणे ते तिरुपती बालाजी देवस्थान (आंध्रप्रदेश) इथपर्यंत एकट्याने सायकलीवर प्रवास केला. हा प्रवास त्याने 1जानेवारी 2023 ला चालु केला होता आणि 7 जानेवारी 2023 संपवला. अवघ्या 6 ते 7 दिवसात अभिषेक ने हा प्रवास पार केला. अभिषेक ला आधीपासूनच प्रवासाची आवड आहे. या आधी त्याने सिंहगड येथे ट्रेकिंग कँप ला देखील तो गेला होता .
अभिषेक ने त्याचा प्रवास पुर्ण झाल्यानंतर त्याने त्याचे काही मनोगत ही व्यक्त केले. येवढा मोठा प्रवास पार करायचा ते ही एकट्याने म्हटल्यावर सुरूवातीला भीती वाटणारच.अनोळखी शहरे अनोळखी माणसं कशी असतील कसे नसतील खूप सारे प्रश्न मनात निर्माण झाले होते पण जसा प्रवास पुढे सरकत गेला तशी ती भीती ही आपोआप निघुन गेली. अभिषेक चे असे ही म्हणणे आहे की फक्त महाराष्ट्र च नाही तर कर्नाटक तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यातील लोकांनी मला खुप प्रेम, आशिर्वाद दिले व मदत देखील केली.मला खूप लोकांनी व लहान मुलांनी कौतुकाने पाहिले तेव्हा मन भरून यायचं .
हा प्रवास मला खूप काही शिकवण देणारा प्रवास होता
यातून एक गोष्ट मला चांगलीच समजली…
माणसाने माणसाशी माणसं सम् वागणे…🥰
विषेश म्हणजे अभिषेक ची फक्त या येवढ्याच प्रवासावर न थांबता त्याला संपूर्ण जग फिरायची ईच्छा आहे…