ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पुणे पिंपरी:-राष्ट्रवादी महिला काँग्रेस आयोजित जनजागर यात्रेस सर्व सामान्य जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

राष्ट्रवादी महिला काँग्रेस आयोजित जनजागर यात्रेस
सर्व सामान्य जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
पिंपरी, दि. 6 (शफिक शेख) :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. जयंतराव पाटील साहेब, विरोधी पक्षनेते मा.ना.श्री. अजितदादा पवार, मा. खासदार श्रीमती फौजिया खान यांच्या नेतृत्वाने महिला प्रदेशाध्यक्षा विद्याताई चव्हाण, डॉ. आशाताई मिरगे, सुनील गव्हाणे, रविकांत वर्पे, कविता म्हेत्रे, वैशालीताई नागवडे, शितल हगवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत यात्रेची सुरुवात केली. जनजागर यात्रेत प्रामुख्याने भाजप विरोधातील महागाई, बेरोजगारी, वेतन, बेताल वक्तव्य, शेतकरी असंतोष, महिला सुरक्षा, अशा सर्व विषयांवर यल्गार करण्यात आला.
जनजागर यात्रेच्या माध्यमातून पिंपरी व भोसरी विधानसभेत प्रत्येक दोन कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम पिंपरी येथे डीलक्स चौक, पिंपरी याठिकाणी तेथील सर्व सामान्य नागरिकांच्या उपस्थितीत सभा घेऊन प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर खंडोबा माळ चौक, आकुर्डी तसेच रुपीनगर-तळवडे व शेवटची सांगता सभा पीएमटी चौक, भोसरी येथे घेण्यात आली.
शहराचे अध्यक्ष अजित गव्हाणे व महिला अध्यक्ष कविता आल्हाट यांच्या मार्गदर्शनाखाली जेष्ठ नेत्या मंगलाताई कदम, विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, राहुल भोसले, शाम लांडे, फजल शेख, विनोद नढे, पंकज भालेकर, विक्रांत लांडे, उषाताई संजोग वाघेरे, हिरानंद उर्फ डब्बू आसवाणी, निकिता कदम, कविता खराडे, वर्षा जगताप, इम्रान शेख, यश साने, विनायक रणसुभे, सतीश दरेकर, संजय उदावंत, दिपक साकोरे, विजय लोखंडे, जगन्नाथ साबळे, अक्षय माछरे, संजय औसरमल, इकलास सय्यद, वैशाली काळभोर, प्रसाद कोलते, विशाल काळभोर, संगीता ताम्हाणे, प्रवीण भालेकर, नारायण बहिरवाडे, संजय वाबळे, पौर्णिमा रविंद्र सोनवणे, दत्तात्रय जगताप, सारिका पवार इत्यादी पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button