ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुणे पिंपरी:-दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना आज महापालिकेच्या वतीने श्रद्धांजली.

प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना आज महापालिकेच्या वतीने श्रद्धांजली.
पिंपरी, दि. ४ (शफिक शेख) :- महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये दिवंगत आमदार जगताप यांच्या प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये नगरसेवक, स्थायी समितीचे सभापती तसेच महापौरपदही भूषवले. शिवाय ते विधान परिषदेचे सदस्यही राहिले आहेत. सध्या ते चिंचवड विधानसभेचे विद्यमान सदस्य होते. त्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने आज श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी माजी नगरसेवक राजू बनसोडे, उपआयुक्त रविकिरण घोडके, सहायक आयुक्त श्रीनिवास दांगट, किरण गायकवाड, आबासाहेब गलबले, दिलीप धुमाळ, मुकेश कोळप, मनोज माछरे, दिगंबर चिंचवडे, नितीन समगीर यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button