ताज्या घडामोडी

सातारा:-पालकमंत्री जाहीर होण्यापूर्वीच मंत्री शिवेंद्रराजांनी स्वीकारले पालकत्व….

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

पालकमंत्री जाहीर होण्यापूर्वीच मंत्री शिवेंद्रराजांनी स्वीकारले पालकत्व….

सातारा दि: सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात महायुतीला निर्विवाद यश मिळाले आहे. मंत्रिमंडळ जाहीर झाले पण जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची गाठ सुटली नाही. परंतु, सातारा- जावळीचे लोकप्रतिनिधी व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सत्कार निमित्त अनेक जण आपली समस्या मांडत आहे. त्या तातडीने सोडवण्याचा प्रयत्न मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले करत आहेत. त्यामुळे त्यांनी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पालकत्व स्वीकारण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेले आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा निकाल जाहीर होऊन आता महिना होत आहे. या कालावधीमध्ये सातारा जिल्ह्यातील कुणाला मंत्रिपद मिळते. याची आकडेवारी मांडली जात होती. परंतु, सातारा जिल्ह्याला चार मंत्री पदाचा जॅकपॉट लागल्यामुळे लाभार्थीची ही संख्या वाढू लागलेली आहे. त्याच्यात अजून पालकमंत्र्याची अधिकृत घोषणा होऊ शकलेली नाही. सातारा जिल्ह्यामध्ये मंत्री शंभूराज देसाई, जयकुमार गोरे, मकरंद पाटील व शिवेंद्रसिंहराजे भोसले असे चार कॅबिनेट मंत्री आहेत. त्या चारही मंत्र्यांना महाराष्ट्रातील एका जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळणारच आहे .सातारचे पालकमंत्री कोण? याबाबत सर्वांचे लक्ष लागले आहे .
काल दुपारी नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सुरुची बंगल्यावर सातारा, सातारा शहर,जावळी मतदारसंघात माण, खटाव ,कोरेगाव, वाई, खंडाळा, महाबळेश्वर व पाटण तसेच कराड येथून त्यांचे हितचिंतक व समर्थक भेटण्यासाठी येत होते. कुणाला घर बांधायचे आहे. त्याची परवानगी हवी. तर कुणाला इच्छुक स्थळी बदली हवी आहे. तर कुणाला आपल्या गावातील विकास कामांबाबत मंजुरी हवी आहे. कुणाला उच्च शिक्षणासाठी विद्यापीठात प्रवेश हवा आहे. अशा अनेक कारणाने लोकांची रीघ लागली आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सत्कार निमित्त अनेक जण कामे सांगत होती. मंत्री शिवेंद्रसिंह राजे ही आपले राजे पण विसरून सर्वसामान्य माणसांसाठी मोबाईल द्वारे आदेश व सूचना करत होते. अजून सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री अधिकृतरित्या जाहीर न झाल्यामुळे नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हेच प्रभारी पालकमंत्री म्हणून अनेकांच्या मनामध्ये घर करून आहेत. त्यांना सातारा जिल्ह्याचे पालक मंत्री करावे. अशी मागणी दत्ता गावडे, सुरेश सावंत,विठ्ठल देशपांडे,विष्णू जाधव, श्रीमती गीता लोखंडे, अंकुश शिवणकर,रविंद्र परामणे, संजय पवार, सलीम शेख, राम पवार, एकनाथ रोकडे यांनी केली आहे. राजकीय दृष्ट्या सर्वच पक्षांमध्ये त्यांचे हितचिंतक असल्याने सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ते योग्य न्याय देतील असा त्यांचे निकटवर्तीय व राजकीय अभ्यासक असा विश्वास व्यक्त करत आहेत.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button