पुणे:-( आंबेगाव खुर्द )- जांभूळवाडी परिसरात एका तरुणाचा निर्गुण खून करून प्रसार झालेल्या आरोपीला इंदौर मध्य प्रदेश येथून ताब्यात घेऊन 24 तासाच्या आत केलं जेरबंद – आंबेगाव पोलिसांची कौशल्यपूर्ण कामगिरी.
पत्रकार अब्दुल रहीम शेख कात्रज शहराध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
पुणे:-( आंबेगाव खुर्द )- जांभूळवाडी परिसरात एका तरुणाचा निर्गुण खून करून प्रसार झालेल्या आरोपीला इंदौर मध्य प्रदेश येथून ताब्यात घेऊन 24 तासाच्या आत केलं जेरबंद – आंबेगाव पोलिसांची कौशल्यपूर्ण कामगिरी.
दिनांक १५/०६/२०२५ रोजी सकाळी १०.०० चे सुमारास आंबेगांव पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अंमलदार हणमंत मासाळ, चेतन गोरे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दिनांक १४/०६/२०२५ रोजी रात्रौ २२.३० वाजताचे सुमारास जांभुळवाडी तलावाचे बांधावर, आंबेगांव खुर्द पुणे येथे एका तरुणाचा निर्घृण खुन केला आहे. सदर माहितीची खात्री करणेकरीता आंबेगांव पोलीस स्टेशनचे वपोनि श्री शरद झिने, पोनि गुन्हे गजानन चोरमले, तपास पथकाचे प्रभारी मोहन कळमकर तसेच तपास पथकातील अंमलदार यांनी बातमीचे ठिकाणी जावून पाहणी केली त्या ठिकाणी एका तरूण मुलाचा खुन झाला असल्याचे दिसले. घडले प्रकाराबाबत इसम नामे दिपक सुरेश बंडगर, वय-२१ वर्षे, प्रतिक हाईट्स, पारे कंपनी रोड, नन्हे पुणे यांनी तक्रार दिल्याने आंबेगांव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर १२४/२०२५, भारतीय न्याय संहीता कलम १०३, २३८ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
खुन करणाऱ्या आरोपीबाबत अधिक माहिती घेतली असता खून करणारा इसम सुरज गणेश सुर्यवंशी, वय-२२ वर्षे, हा इंदौर मध्यप्रदेश येथे गेला असल्याची माहिती मिळाली.माहिती मिळताच तात्काळ तपास पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर व पोलीस अंमलदार चेतन गोरे, हणमंत मासाळ, धनाजी धोत्रे, सचिन गाडे असे इंदौर, मध्यप्रदेश येथे जावुन मिळालेल्या माहितीच्या आधारे तसेच तांत्रीक विश्लेषण करुन गुन्हयातील आरोपी याचा शोध घेतला असता तो इंदौर, मध्यप्रदेश येथे मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्यांचेकडे कसोशीने तपास करता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्यास सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त, पुणे शहर मा. अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त मा. रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे मा. राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-२ पुणे श्रीमती स्मार्तना पाटील, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग पुणे श्री. राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने, पोनि गुन्हे गजानन चोरमले, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका गोरे, पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर, मारुती वाघमारे, पोलीस अंमलदार शैलेंद्र साठे, चेतन गोरे, हणमंत मासाळ, विनायक पाडळे, निलेश जमदाडे, सचिन तनपुरे, प्रमोद कांबळे धनाजी धोत्रे, सचिन गाडे, प्रमोद भोसले, नितीन कातुर्डे, योगेश जगदाळे, सुभाष मोरे, हरिश गायकवाड, अजय कामठे, यांच्या पथकाने केली.