पुसेसावळी:-वडगाव ज.स्वा चे सुपुत्र श्री केदार जांदे यांना वृक्षमित्र ही पदवी प्रदान.
पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
वडगाव ज.स्वा चे सुपुत्र श्री केदार जांदे यांना वृक्षमित्र ही पदवी प्रदान.
(वडगाव ज.स्वा.)ता. खटाव चे सुपुत्र केदार जांदे यांना रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रियल एरिया यांच्याकडून वृक्षमित्र ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. केदार जांदे यांनी 21 मे 2021 रोजी आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त वृक्ष लागवडीची सुरुवात त्यांनी केली. तसेच कात्रप तलाव,पनवेल हायवे, वृद्धाश्रम, आणि सातारा येथील आपल्या शेतात वृक्षारोपण केले.कात्रप तलावातून पाणी आणून दूरवर असणाऱ्या झाडांना पाणी देणे, गवताला आग लागून झाडे पेटू नये यासाठी वेळोवेळी गवत साफ करणे, झाडे आपल्या अपत्या प्रमाणे वाढवणे, त्यांना जोपासने तसेच त्यांच्या या कार्यात विनोद जडे, प्रतीक जडे, रमेश काका, हेमंत चौधरी, नागार्जुन व पुरुषोत्तम काका या सर्व सहकाऱ्यांची मोलाची साथ लाभल्याने त्यांनी वृक्षारोपण लागवडीचे कार्य अविरत चालू ठेवले. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना दि. 15 जून 2025 रोजी रोटरी जिल्हा 3142 चे प्रांतपाल हर्ष मकोल यांच्या हस्ते वृक्षमित्र ही पदवी प्रदान करण्यात आली. तसेच त्यानिमित्त मा.श्री.छ.खा.उदयनराजे भोसले,विठ्ठल स्वामी महाराज मठाधिपती वडगाव (ज.स्वा), सह्याद्री कारखाना संचालक संतोष घार्गे,हेमंत जांदे ,सचिन जांदे (काका), दुटाळ सर, प्रतीक सराफ,आकाश सूर्यवंशी,प्रशांत जांदे व समस्त ग्रामस्थ वडगाव (ज.स्वा) यांच्याकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.