धावडी:-(वाई)-ग्रामीण भाग ठाम मैदानात! धावडीचा थेट इशारा – “आता आम्ही तुमच्याच सोबत!”
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

ग्रामीण भाग ठाम मैदानात! धावडीचा थेट इशारा* – “आता आम्ही तुमच्याच सोबत!”

धावडी (प्रतिनिधी) – धावडी गावातील कार्यकर्ते व ग्रामस्थांनी नगराध्यक्ष श्री. अनिल सावंत ऊर्फ भाऊसाहेब यांचा जोरदार सन्मान करत नेतृत्वावर निर्विवाद शिक्कामोर्तब केले. याच कार्यक्रमात नगरसेवक व भाजपा शहर अध्यक्ष श्री. विजयजी ढेकणे यांचाही दणक्यात सत्कार करण्यात आला.
यावेळी ग्रामस्थांनी स्पष्ट शब्दांत घोषणा केली – “आता ग्रामीण भाग तुमच्या सोबत ठाम उभा आहे; मागे फिरायचा प्रश्नच नाही!”
भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी श्री. काशिनाथ शेलार यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात धावडीतील नागरिकांनी विकासकामांना गती देणाऱ्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. कामातून बोलणारे नेतृत्व, थेट निर्णय आणि ग्रामीण प्रश्नांवर आक्रमक भूमिका यामुळेच अनिल सावंत व विजय ढेकणे यांना ग्रामीण भागातून भक्कम बळ मिळत असल्याचे यावेळी ठळकपणे दिसून आले.
हा सन्मान नव्हे तर ग्रामीण शक्तीचा थेट संदेश असल्याची चर्चा परिसरात रंगली असून, आगामी राजकीय घडामोडींमध्ये धावडीचा आवाज निर्णायक ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.




