छ.संभाजीनगर:-श्री घृष्णेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट च्या वतीने श्रावण महिना निमित्ताने जय्यत तयारी …
पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर
RPS STAR NEWS
श्री घृष्णेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट च्या वतीने श्रावण महिना निमित्ताने जय्यत तयारी …
छ.संभाजीनगर प्रतिनिधी ता.4
वेरूळ येथील १२ वे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिर येथे श्रावणात शिवभक्तांची मोठी वर्दळ असते. श्रावणात येणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी देवस्थान ट्रस्ट वतीने श्रावण महिना निमित्ताने जय्यत तैयारी करण्यात आली आहे.
श्रावण महिन्यातील भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता भाविकांना सुलभतेने दर्शन घेता यावे, स्वच्छता, पार्किंग, फराळ यावर देवस्थान ट्रस्ट च्या वतीने भर देण्यात आला.
शिवलिंगावर पूजेसाठी फक्त बेलाची पान, फुले, नारळ, प्रसाद यांचाच वापर करण्यात यावा असे आवाहन देवस्थान ट्रस्ट च्या वतीने भाविकांना करण्यात आले आहे.
तर गावकर्यांसाठी सकाळी ४ ते ७ वाजेपर्यंत मंदिराच्या दक्षिणेकडील दरवाजाने आधार कार्ड दाखवून थेट दर्शन घेण्याची सुविधा प्रशासनाने उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती घृष्णेश्वर देवस्थान ट्रस्ट च्या वतीने दिली आहे.