आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फलटण:-माजी विद्यार्थ्यांचा आम्हाला सार्थ अभिमान : प्रल्हादराव साळुंखे पाटील.

संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

माजी विद्यार्थ्यांचा आम्हाला सार्थ अभिमान : प्रल्हादराव साळुंखे पाटील.
साखरवाडी :
साखरवाडी विद्यालय हे ग्रामीण भागात असूनही या विद्यालयाचे पन्नास हून अधिक विद्यार्थी क्रीडा व शासकीय परीक्षा देऊन आय.ए.एस. सारख्या उच्च शासकीय पदावर कार्यरत आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे साखरवाडी शिक्षण संस्थेचे विश्वस्त समितीचे अध्यक्ष प्रल्हादराव साळुंखे पाटील यांनी साखरवाडी येथे पारेतोषिक वितरण समारंभात सांगितले.
साखरवाडी विद्यालयाचे ७७ वे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना प्रल्हादराव साळुंखे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून या विद्यालयाच्या माजी विद्यार्थी विभागीय वन अधिकारी, पुणे विभाग सारीका जगताप, दंतशास्त्र विभाग प्रमुख, यशवंतराव स्मृती रुग्णालय चे डॉ. यशवंत इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संस्थेचे अध्यक्ष धनंजय साळुंखे पाटील, संचालक विक्रम आपटे, राजेंद्र शेवाळे, राजेंद्र भोसले, कौशल भोसले, सरपंच रेखा जाधव, उपसरपंच अक्षय रुपनवर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना सारीका जगताप यांनी सांगितले की, खो-खो सारखा खेळ साखरवाडीने शून्यातून निर्माण केला. मी या खेळाच्या जोरावरच शासकीय परीक्षा देऊन कार्यरत आहे. या शाळेने दादोजी कोंडदेव, राणी लक्ष्मीबाई तसेच छत्रपती पुरस्कार या सारखे पुरस्कार या विद्यालयाने पटकावले आहेत व शाळेचे नाव उज्ज्वल केले. अभ्यास व सराव सातत्यपूर्ण केल्यावर यश लोटांगण घालून येते असे त्यांनी सांगितले. त्यांनी शाळेस लॅपटॉप व रु.१०,०००/- ची शिष्यवृत्ती जाहिर केली.
समारंभास माजी मुख्याध्यापक प्रल्हाद बोंद्रे, ताराचंद जगताप, संपत चांगण, पुणे येथील माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनिल भोसले यांनी केले. आभार नितीन शिंदे यांनी मानले.
यावेळी बालक, प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी करमणूकीचा बहारदार कार्यक्रम सादर केला. यामध्ये ६५० चे वर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. साखरवाडी व परीसरातून प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button