आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कोल्हापूर :: सीपीआर हॉस्पिटल मधील डॉक्टरांचा संप दुसऱ्या दिवशीही सुरूच…
प्रतिनिधी सागर पिसाळ:-7875411591

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
कोल्हापूर :: सीपीआर हॉस्पिटल मधील डॉक्टरांचा संप दुसऱ्या दिवशीही सुरूच…
“मोडकळीस आलेली वसतिगृहे दुरुस्त करावीत, वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या जागा रिक्त भराव्यात, सहयोगी व सहाय्यक प्राध्यापकांच्या अपुऱ्या जागा तातडीने भराव्यात’ व अन्य मागण्यांसाठी शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी राज्यभरात कालपासून काम बंद आंदोलन केले. कोल्हापूर मध्ये ही याचे पडसाद उमटले कोल्हापूर येथील सीपीआर हॉस्पिटल मधील डॉक्टरांचा संप आज दुसऱ्या दिवशी सुरूच होता. जोपर्यंत शासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही तोपर्यंत हा संप असाच सुरू राहील अशी माहिती सीपीआर कोल्हापूर मार्ड उपाध्यक्ष डॉ.प्रज्ञा पिसाळ यांनी दिली…
प्रतिनिधी – सागर पिसाळ (7875411591)