पुणे:- म्हाळुंगे-दरोडाविरोधी पथकाची धमाकेदार कारवाई; 43 लाख रूपयांचा गुटखा जप्त.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
दरोडाविरोधी पथकाची धमाकेदार कारवाई;
43 लाख रूपयांचा गुटखा जप्त.
म्हाळुंगे, दि. 1 (शफिक शेख):- गुटखा आणि अंमली पदार्थांच्या विक्रीने आणि त्यास प्रोत्साहन देणा-या घटकांविरोधात नवीन वर्षाच्या सुरूवातीस नवनियुक्त पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी मोहीम उघडीत दरोडा विरोधी पथक गुन्हे शाखा आणि म्हाळुंगे पोलीस यांच्या संयुक्त कारवाई नवीन वर्षाच्या सुरूवातीस सुमारे 43,03,000/- रूपयांचा गुटखा, 15,00,000/- किंमतीचा एक आयशर टेम्पो आणि एक महिंद्रा पिकअप असा एकुण 58,03,200/- रूपयांचा माल जप्त करीत या गुटखा आणि अंमली पदार्थांनी त्रासलेल्या पिंपरी चिंचवडकरांना नवीन वर्षाची भेट दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दरोडा विरोधी पथकास कुरूळी-निघोजे रोडच्या डाव्या बाजूस दिक्षीका लॉजिस्टिक कंपनीसमोर मोकळया जागेत मु. पो. कुरूळी गाव, ता. खेड, जि. पुणे येथे गुटख्याने भरलेला ट्रक उभा असल्याची माहिती मिळाली. आयुक्तांच्या आदेशाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास इंगवले दरोडा विरोधी पथक, गुन्हे शाखा यांच्या पथकाने छापा मारत सुमारे 43,03,000/- रूपयांचा गुटखा, 15,00,000/- किंमतीचा एक आयशर टेम्पो आणि एक महिंद्रा पिकअप असा एकुण 58,03,200/- रूपयांचा माल जप्त केला. तसेच या प्रकरणामध्ये गुंतलेले आरोपी राजु राम देवासी, वय 21, रा. चिखली, राकेश बीजाराम देवासी, वय 19, रा. चिखली, दुधाराम बेहरराम देवासी, वय 29, रा. सदर, श्रावण कुमार धनेशराम देवासी, वय 29, गोकुळ मुरलीधर योगी, वय 34 आणि कुख्यात गुटखा विक्रेता नरेश देवासी, रा. मोरे वस्ती, चिखली पुणे यांना अटक केली आहे. फिर्यादी म्हणून म्हाळुंगे पोलीस चौकीचे पोलीस शिपाई विनोद वीर यांनी काम पाहिले.
या कारवाईने नागरिकांमधून पिंपरी चिंचवड पोलिसांचा आभार मानण्यात येत असून या सर्व आरोपींना नियमाप्रमाणे शिक्षा व्हावी आणि या जप्त केलेल्या मालाची कायदेशीर नियमाप्रमाणे विल्हेवाट लावण्यात यावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, मा. सह. पोलीस आयुक्त मनोज लोहिया, मा. अपर. पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, मा. पोलीस उपआयुक्त गुन्हे स्वप्ना गोरे, सहा. पो. आयुक्त गुन्हे पद्माकर घनवट, सहा. पो. आयुक्त गुन्हे डॉ. प्रशांत अमृतकर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास इंगवले दरोडा विरोधी पथक, गुन्हे शाखा, सहा. पो. नि. अंबरिष देशमु, पो. उप.नि. मंगेश भांगे, पो. उप.नि. भरत गोसावी, पो. अंमलदार महेश खांडे, नितीन लोखंडे, गणेश हिंगे, विनोद वीर, गणेश सावंत, सुमित देवकर, सागर शेडगे, गोविंद सुपे, राजेश कौशल्य व विक्रांत गायकवाड यांच्या पथकाने केली.