ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुणे:-ऋण वसुली न्यायाधिकरण आयोजित लोकन्यायालयामध्ये ६०४ कोटी रुपयांची वसुली.

प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

ऋण वसुली न्यायाधिकरण आयोजित
लोकन्यायालयामध्ये ६०४ कोटी रुपयांची वसुली
पुणे, दि. 26 (शफिक शेख):- ऋण वसुली न्यायाधिकरण पुणे यांच्यावतीने आयोजित लोकन्यायालयामध्ये २३० खटल्यांच्या तडजोडीतून ६०४ कोटी रुपयांची वसुली करण्यात आल्याची माहिती न्यायाधिकरणाचे प्रबंधक एस. एम. अबूज यांनी दिली. या लोकन्यायालयामध्ये बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, आय. डी. बी. आय. बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक व इतर बँका व वित्तीय संस्थानी भाग घेतला.
लोकन्यायालयाचे उद्घाटन ऋण वसुली अपिलीय न्यायाधिकरण मुंबईचे अध्यक्ष तथा केरळ उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अशोक मेनन आणि पुणे ऋण वसुली न्यायाधिकरणाचे पिठासीन न्यायाधीश तथा निवृत्त प्रमुख जिल्हा न्यायाधिश दिलीप मुरूमकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या लोकन्यायालयामध्ये २३० खटले तडजोडीने मिटविण्यात यश आले. या लोकन्यायालयामध्ये निवृत्त जिल्हा न्यायाधिश एस. जे. काळे, एस. बी. जगताप, डी. डी. कांबळे, अभय पटनी, करण चंद्रनारायण, ॲड. नारायण खामकर, ॲड. विजय राऊत, ॲड. स्मिता घोडके, ॲड. श्रुती किराड, ॲड. रेश्मा माळवदे आणि ॲड. प्रियंका मानकर यांनी काम पाहिले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button