आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
राहता:-श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र दुर्गापुर रौप्यमहोत्सव वर्षानिमित्त भव्य शेतकरी मेळावा.
प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042
मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
लोहगाव (वार्ताहर)
राहाता तालुक्यातील दुर्गापूर येथे श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र दुर्गापुर येथे रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त भव्य शेतकरी मेळावा मंगळवार दिनांक 27 डिसेंबर २०२२ रोजी दुपार दोन वाजता श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दुर्गापुर येथे संपन्न होणार आहे.
मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक आदरणीय परमपूज्य गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे हे उपस्थित राहणार आहे या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणून नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील .माजी मंत्री श्री अण्णासाहेब म्हस्के पाटील. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील. माननीय डॉक्टर राजेंद्र विखे पाटील .खासदार डॉक्टर सुजय दादा विखे पाटील हे यावेळी उपस्थित राहणार आहे.
तरी सदर कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन दुर्गापूर येथील समस्त ग्रामस्थ व सेवेकरी मंडळ उत्तर नगर जिल्हा सेवेकरी मंडळ यांनी केले आहे