आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फलटण:-सस्तेवाडी कचरा डेपोत नियमांचे उल्लंघन : मृत जनावरे टाकली जातात ,गावकऱ्यांचा विरोध.

संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

सस्तेवाडी कचरा डेपोत नियमांचे उल्लंघन :
मृत जनावरे टाकली जातात ,गावकऱ्यांचा विरोध.

फलटण :
स्वच्छ व सुंदर फलटण साठी संपूर्ण शहरातून घंटागाडी मार्फत कचरा गोळा केला जातो . ओला कचरा व सुका कचरा वेगळा घेतला जातो . शहराचे आरोग्य हे सार्वजनिक स्वच्छतेवर आवलंबून असते या मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची भूमिका महत्त्वाची असते .कचरा गोळा केल्या नंतर त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी सुद्धा पालिकेची असते . हा कचरा शहरालगत असणाऱ्या सस्तेवाडी गावाजवळील कचरा डेपोत नेऊन टाकला जातो. परंतू हे करत असताना नियमांचे उल्लंघन होताना दिसते
फलटण सस्तेवाडी कांबळेश्वर रोडवरती कचरा डेपो असुन. त्या कचरा डेपो मध्ये मृत जनावरांचे शव आणुन टाकले जात आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे सस्तेवाडी, कांबळेश्वर गावचे आरोग्य धोक्यात असुन. गेली दहा वर्षे गावचे लोक या कचरा डेपो मुळे हैराण आहेत .गावातील मुख्य रस्त्यालगत हा कचरा डेपो असल्या मुळे अनेकदा मृत जनावरांचे शव रस्त्यावर येऊन पडलेले दिसते .गावाच्या प्रवेशद्वारावरच हा कचरा डेपो आहे त्यामुळे गावात प्रवेश करतानाच किळसवाने वाटते
फलटण तालुक्याला होणारा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा याठिकाणा नजीक होत असुन फलटणच्या जनतेचे आरोग्य सुद्धा धोक्यात येऊ शकते. फलटणला शहराला होणार पाणी पुरवठा हा सोमवार पेठ या भागाच्या ठिकाणा वरून होतो.या कचरा डेपो च्या बाबतीत स्थानिक नेते, पुढारी यांच्या कडून अनेक आश्वासने देण्यात आली परंतु गेली १० वर्षे झाली सस्तेवाडी गावाचा प्रश्न हा प्रश्नच राहिला.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button