फलटण:-सासकल मध्ये केळीची आंतरमशागत – प्रात्यक्षिक संपन्न.
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
सासकल मध्ये केळीची आंतरमशागत – प्रात्यक्षिक संपन्न.
सासकल ता फलटण येथे महात्मा फुले कृषी विदयापीठ, राहुरी संचलित कृषी महाविदयालय, फलटण येथील कृषिकन्यांनी कृषी कार्यानुभव उपक्रम अंतर्गत ‘केळीची आंतरमशागत- पिल्ले काढणी’ यावर प्रात्यक्षिक सादर केले.
महाराष्ट्रात प्रामुख्याने घेतले जाणारे फळपीक म्हणजे केळी . केळीच्या चांगल्या उत्पादनासाठी जमिनीची निवड, वाणाची निवड,खते इ.यांची माहिती असणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे केळीच्या बागेची आंतरमशागत कशी करावी हे देखील माहिती असणे गरजेचे असते. या आंतरमशागती मध्ये केळीची पिल्ले काढणे गरजेचे असते. ही केळीची
पिल्ले 30-35 दिवसांनंतर उगवलेली दिसतात. या केळीच्या पिल्लांमुळे उत्पादनावर काय परिणाम होतो, ती कशी काढावी याचे मार्गदर्शन या कृषिकन्यांनी शेतकऱ्यांना केले.
यावेळी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, प्रा. एन. एस. धालपे, प्रा. एन. ए. पंडित, प्रा.एस. वाय. लाळगे आणि विषय मार्गदर्शक- एस. एस. अडत यांचे कृषिकन्या वैभवी ढमे, शिल्पा भिसे, दिप्ती भोईटे, मैथिली पोरे, अस्मिता सावंत, गौरी रणदिवे, आर्या शिंदे यांना मोलाचे मागदर्शन लाभले.