कात्रज-संतोषनगर ते दत्तनगर रस्ता नागरिकांसाठी “मौत का कुवाँ…..”
प्रतिनिधी अब्दुलरहीम शेख पुणे कात्रज :-8087601074

कात्रज-संतोषनगर ते दत्तनगर रस्ता नागरिकांसाठी “मौत का कुवाँ….
कात्रज, दि. 12 (अब्दुलरहिम शेख ) :- येथील दत्तनगरच्या काॅर्नरलगत नविनच झालेल्या शोरूमच्या पार्किंगमुळे वाहनांची वर्दळ हात असून याठिकाणी रस्त्यावर जीवघेणे ट्रॅफिक होत आहे संबंधितांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
कात्रज संतोषनगर ते दत्तनगर हा रस्ता वाहनाच्या वर्दळीमुळे जीवघेणा बनला आहे. दत्तनगर काॅर्नरलगत नविनच सुरू करण्यात आलेल्या शोरूम येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांचे पार्किंग रस्त्यालगत केले जात असून समोरील बाजूस पानटपरी असल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली असून रस्त्यावर वाहनांची खूपच गर्दी होत आहे जेणेकरून नागरिक, प्रवासी हैराण झाले आहेत.
दिवसभराच्या कामामुळे घरी जाताना रस्त्यावर दोन तीन तास ट्रॅफिकमध्ये ब्लडप्रेशर आणि शुगरच्या पेशंटला मरणाच्या दारावर उभे राहिल्यासारखे वाटते अशी खंत दत्तनगर परीसरात एका नागरिकाने व्यक्त केली.
तरी संबंधितांनी सदरील रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करुन वाहनाच्या पार्किंगमुळे होणार्या अडथळ्यांची व्यवस्था करावी अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा येथील नागरिकांकडून देण्यात आला आहे.