आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-कावीळ विषयी समाजात जनजागृती होणे गरजेचे – डॉ.युवराज करपे.

पत्रकार श्रीनिवास पवार ACLS चीफ रिपोर्टर सातारा जिल्हा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार श्रीनिवास पवार ACLS चीफ रिपोर्टर सातारा जिल्हा

RPS STAR NEWS

कावीळ विषयी समाजात जनजागृती होणे गरजेचे
– डॉ.युवराज करपे.

 

सातारा दि. 30
२८ जुलै हा दिवस जागतिक कावीळ दिन म्हणून साजरा केला जातो.या अनुषंगाने समाजामध्ये कावीळ आजाराविषयी जनजागृती व्हावी या साठी जिल्हा रुग्णालय सातारा येथे जनजागृती रॅली चे आयोजन करण्यात आले होते.
सदर रॅली च्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.युवराज करपे , अति.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राहुल देव खाडे,डॉ.सुभाष कदम,डॉ.राहुल जाधव,डॉ.रामचंद्र जाधव,डॉ.चंद्रकांत काटकर,सहाय्यक अधीपरीचारिका श्रीम.प्रतिभा चव्हाण, प्रा.अमोल देसाई इ.मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.युवराज करपे यांनी मनोगत व्यक्त केले की कावीळ हा आजार एच.आय.व्ही पेक्षाही घातक असून सर्वांनी काळजी म्हणून कावीळ प्रतिबंधात्मक लस घेणे गरजेचे आहे. ‘ ब ‘ प्रकारच्या कावीळ करिता २४ तासाचे आत पोस्ट एक्सपोजर प्रोफेल्याक्सिस देखील उपलब्ध आहे.
या नंतर सर्व मान्यवरांचे हस्ते रॅली ला हिरवा झेंडा दाखऊन रॅली ला मार्गस्थ केले. सदर रॅली मध्ये नर्सिंग कॉलेज सातारा चे १०० विद्यार्थी सह जिल्हा रुग्णालय सातारा मधील अधिकारी,कर्मचारी , विविध अशासकीय संस्थे चे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तावीक जिल्हा एड्स नियंत्रण विभागाचे कार्यक्रम अधिकारी श्री.हेमंत भोसले यांनी केले आभार जिल्हा कावीळ नियंत्रण कार्यक्रम च्या प्रयोगशाळा तंत्रज्ञ रूपाली कदम यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन कावीळ नियंत्रण कार्यक्रम च्या समन्वयक श्रीम. फरजाना पटनकुडे व जिल्हा एड्स नियंत्रण कार्यक्रमाचे समन्वयक पुंडलिक पाटील यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ.सुजाता राजमाने यांनी केले.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button