आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खटाव:-मनसेच्या वतीने खटाव तालुक्यात डॉ. आंबेडकरांचे प्रतिमा भेट देऊन विनम्र अभिवादन.

प्रतिनिधी अजित जगताप सातारा:-9922241299

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

प्रतिनिधी अजित जगताप सातारा

मनसेच्या वतीने खटाव तालुक्यात डॉ. आंबेडकरांचे प्रतिमा भेट देऊन विनम्र अभिवादन.

वडूज दि: रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वधर्मसमभावाची शिकवण तेवीत ठेवून संविधानाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपली लेखणी चालवणारी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा संघटक सुरज लोहार यांनी डॉ. आंबेडकर यांची प्रतिमा कार्यकर्त्यांना भेट देऊन विनम्र अभिवादन केले.
मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडव्याला मेळाव्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखीच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याचा आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना दिला होता. त्यापूर्वीच मनसे सैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा फुले, डॉ. आंबेडकर जयंतीची जोरदार तयारी सुरू केली होती. त्याचाच एक भाग म्हणून खटाव तालुक्यातील वडूज नगरीत मनसेचे जिल्हा संघटक श्री लोहार यांनी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सही असलेली प्रतिमा भेट देऊन विनम्र अभिवादन केले.
या वेळेला उद्योजक संतोष बर्गे, रिपब्लिकन सोशॅलिस्ट पार्टीचे राज्य सरचिटणीस आनंदा साठे, रिपब्लिकन पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष गणेश भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका संघटित व्हा व संघर्ष करा ही शिकवण दिलेली आहे. आज मराठी माणूस व हिंदुत्वासाठी मनसे पक्ष संघर्ष करत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने भारतामध्ये ”सब का साथ” ”मनसे के साथ”’ असा नारा दिलेला आहे.
आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त सर्वत्र जल्लोष साजरा होत आहे. वडूज नगरी येथे हॉटेल गंधर्व मध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहावे यासाठी ही प्रतिमा भेट दिलेली आहे. भविष्यात प्रत्येक आंबेडकरवाद्यांच्या घरांमध्ये संविधानाची प्रत पोचवण्याची जबाबदारी मनसे पार पाडेल. असे विश्वास यावेळी श्री सुरज लोहार यांनी व्यक्त केला. प्रतिनिधित्व स्वरूपात सातारा जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार व आंबेडकरी चळवळीचे खंदे कार्यकर्ते अजित जगताप यांच्याकडे ही प्रतिमा सुपूर्द करून छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर , लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जयघोष करण्यात आला आहे.
—————————————————————-
फोटो – डॉ बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा भेट देताना मनसेचे सूरज लोहार व मान्यवर (छाया -. संतोष बर्गे, वडूज)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button