ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुणे:-सीआयडीचे अपर पोलीस महासंचालक रितेश कुमार पुणे पोलीस आयुक्तपदी.

प्रतिनिधी शफीक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

सीआयडीचे अपर पोलीस महासंचालक
रितेश कुमार पुणे पोलीस आयुक्तपदी.
पुणे, दि. 17 (शफिक शेख):- गृह विभागाने मंगळवारी (दि.13) राज्यातील वरीष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. सीआयडीचे अपर पोलीस महासंचालक रितेश कुमार यांची पुणे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. तर पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची मुंबईत कायदा व सुव्यवस्थाच्या अपर पोलीस महासंचालकपदी बदली करण्यात आली आहे. पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी (शुक्रवार) पदभार स्विकारला.
नवीन पोलीस आयुक्तांचा अल्प परिचय
अतिशय शांतपणे काम करणारे रितेश कुमार हे 1991 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी सांगली येथे पोलीस अधीक्षक म्हणून काम पहिले होते. मुंबई पोलीस दलात अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी काही काळ काम केले. राज्य गुन्हे अन्वेषण विभागात ते पोलीस महानिरीक्षक म्हणून यापूर्वी काम केले आहे. त्यानंतर पुण्यातील बिनतारी संदेश विभागात अपर पोलीस महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. पुण्यात पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती होण्यापुर्वी रितेश कुमार हे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे म्हणजेच सीआयडीचे प्रमुख होते. सीआयडीचे प्रमुख आणि अप्पर पोलिस महासंचालक म्हणून त्यांनी सीआयडी विभागात कर्तव्य बजाविले.
बिनतारी संदेश विभागाचे अत्याधुनिकरण करण्याबरोबर देशपातळीवर सर्वाधिक उच्च तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करणारे राज्य व गोपनीयता राखण्यासाठी सर्वात सुरक्षित तंत्रज्ञान वापर असे दोन पारितोषिक मिळवून देण्यात पोलीस आयुक्त रितेश कुमार यांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यानंतर गेल्यावर्षी सीआयडीमध्ये बदली झाल्यावर रितेश कुमार यांनी गुन्हेनिर्गती वेगवान होण्यासाठी प्रयत्न केले. सीआयडीमध्ये कार्यरत असताना रितेश कुमार यांनी संपुर्ण महाराष्ट्रात CCTNS/ ICJS ही प्रणाली यशस्वीपणे राबविली आहे. त्यासाठी देश पातळीवर त्यांचा आणि सीआयडीमधील इतर अधिकार्यांचा केंद्र सरकारकडून गौरव देखील करण्यात आला होता.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button